शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक बक्षिसांच्या नावावर लाखो रुपयांनी गंडविले

By admin | Updated: June 3, 2016 00:35 IST

विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आमिष देऊन कमी दिवसात जास्त लाभ देण्याचे सांगुन नंतर हात वर केल्याच्या घटना दररोज घडत असतात.

लाखांदूर : विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आमिष देऊन कमी दिवसात जास्त लाभ देण्याचे सांगुन नंतर हात वर केल्याच्या घटना दररोज घडत असतात. अशाच एका आकर्षक योजनांच्या माध्यमातून जे.एस. व्ही कंपनीने जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रूपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्राहकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्याकडे चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले आहे. मध्यप्रदेशातील भोपाल येथे मुख्य कार्यालय असलेल्या जे.एस.व्ही. डेव्हलपर इंडिया या कंपनीने सन २००९ मध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात शाखा उघडल्या. हळूहळू दोन्ही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाळे पसरविले. तिन्ही जिल्ह्यातील शाखांचा कारभार दिनेश टेंभरे व योगेश रेहपाडे सांभाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कारभार वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कमीशन आधारावर अभिकर्त्यांचीही नेमणूक करण्यात आली. विकास संगोष्टीचे कार्यक्रम, इन्शुरन्स, आर.डी.एफ.डी बद्द्ल माहिती देऊन मिनीस्ट्री आॅफ कारपोरेट अफेअर्स आणि रजिस्ट्री आॅफ कंपनीचे दस्ताऐवज गुंतवणुकदारांना दाखवुन आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले. गुंतवणुकीची रक्कम गोळा करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची नेमणूक केली. कंपनीने रक्कम परतफेडीसाठी गुंतवणुकदारांना वचननामा सुध्दा लिहून दिला. २० सप्टेंबर २०११ ला जाहीर सुचनेद्वारे कंपनीकडे पुरेशा प्रमाणात निधी व पायाभुत सुविधा असल्याची माहिती प्रकाशीत करून गुंतवणूकदारांना मोहात टाकले. मात्र आता सदर कंपणीने उद्देश बाजुला सारून गुंतवणुकदार व अभिकर्त्याकडे दुर्लक्ष करीत परजिल्ह्यात जाळे पसरवित असल्यामुळे सदर कंपनीने गंडा घातल्याचे दिसून येत आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहे.यासंदर्भात खासदार नाना पटोले यांना निवेदन सादर करून त्या कंपनीची चौकशी व गुंतवणुकदारांचे पैसे मिळवून देण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून गोपाल हुमणे, सरस्वती मेश्राम, संजय मेहेंदळे, रिना रहेले, सिमा चढ्डा, नामदेव हटवार निवेदनकर्त्यांनी निवेदन सादर केले. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा ईशाराही निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)