घर लाखोंचे; सुरक्षेकडे कानाडोळा
By Admin | Updated: September 9, 2014 00:10 IST2014-09-09T00:10:20+5:302014-09-09T00:10:20+5:30
दाराला कुलूप लावले किंवा लॉक लावले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत. त्या बघता कुणीही देणार नही, तेव्हा लाखो रुपयाचे घर बांधताना दारावरील

घर लाखोंचे; सुरक्षेकडे कानाडोळा
मुरमाडी : दाराला कुलूप लावले किंवा लॉक लावले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत. त्या बघता कुणीही देणार नही, तेव्हा लाखो रुपयाचे घर बांधताना दारावरील कडीकोंड्याच्या सुरक्षेतेकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
शहरासह ग्रामीण भागात मागील काही वर्षात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. या चोऱ्यांच्या घटनात चोरटे कुलूप तोडण्याऐवजी हतोडीने कडी कोयंडाच एका दणक्यात तोडत असल्याचे निदर्शनात आले. डायकास्ट ब्रासचे हे आकर्षक दिसणारे कडी कोडे केवळ दाराची शोभा वाढविण्यापुरतेच ठरले आहे.
भर दिवसा घरात घुसणे पत्रे काढून घरात प्रवेश करणे लोखंडी दरवाजाचा कडी कोंडा मोडून टाकणे, भिंतीला भगदाड पाडून घरात प्रवेश करणे बंद करे हेरून चोरी करणे इत्यादी पद्धतीचा अवलंब चोरट्यांद्वारे केला जातो. घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोेरटा चोरून नेतो. हे दागिने बनविण्यासाठी त्या कुटुंबाला अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागलेले असतात. चोरीमुळे त्यांना मानसिक धक्का बसतो. कित्येकदा पगार, शैक्षणिक घरकार्यक्रमात आणून ठेवलेली रोकड पळविली जाते. त्याचा मानसिकतेवर आघात होतो. त्यातून सावरण्यासाठी खूप दिवस लागतात. चोरटा सापडेल याची शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शून्यातून संसार उभा करावा लागतो. त्यामुळे घराच्या सुरक्षितेतबाबत अधिक गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)