शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

ब्रेक द चेनच्या विरोधात व्यापारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 5:00 AM

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासनाने मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी झाली; परंतु बाजारपेठ बंदचा मंगळवार दिवस असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी आपली प्रतिष्ठाने उघडायला गेली तेव्हा नगर परिषदेच्या पथकाने त्याला विरोध केला. गांधी चौकातील गणेश ऑपसेट हे प्रतिष्ठान साहित्य बाजार काढण्यासाठी काही वेळासाठी उघडले. त्याच वेळी नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नगरपरिषद-पोलीस ठाण्यावर धडक, बाजारपेठ बंद, रस्त्यावर गर्दी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाने घोषित केलेल्या ब्रेक द चेनच्या विरोधात भंडारा शहरातील व्यापारी बुधवारी आक्रमक झाले. गांधी चौकात एकत्र येऊन नगर परिषदेसह पोलीस ठाण्यावर धडक दिली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करून दुकाने उघडण्याचा इशारा दिला. दरम्यान, संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद असली तरी रस्त्यावर मात्र नागरिकांची गर्दी दिसत होती.कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासनाने मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी झाली; परंतु बाजारपेठ बंदचा मंगळवार दिवस असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी आपली प्रतिष्ठाने उघडायला गेली तेव्हा नगर परिषदेच्या पथकाने त्याला विरोध केला. गांधी चौकातील गणेश ऑपसेट हे प्रतिष्ठान साहित्य बाजार काढण्यासाठी काही वेळासाठी उघडले. त्याच वेळी नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले. त्यावरून मोठा वाद झाला. त्यामुळे सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्र आले. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हा जमाव भंडारा पोलीस ठाण्यावर पोहोचला. तब्बल तासभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. अखेर त्यांची समजूत काढण्यात यश आले. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन दिले. लाॅकडाऊन करायचे तर करा. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार, आम्ही घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाने द्यावे अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आदेश शासनाचे आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू आणि दुकाने उघडू, असा इशारा दिला. यावेळी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर बिसेन, सोनू वाधवानी, विक्की रावलानी, विकास मदनकर, राजकुमार भोजवानी यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी शहरातील रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.

सांगा आम्ही जगायचे तरी कसे? वर्षभरापासून कोरोनाने व्यापार, व्यवसाय ठप्प झाला आहे. आता पुन्हा शासनाने वीकेंड लाॅकडाऊन घोषित केले. मात्र, यात चलाखी करून संपूर्ण सातही दिवस बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा, असा सवाल व्यापारी विचारत होते. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांचा तर आणखी गहन प्रश्न आहे. दुकान उघडले नाही तर रात्री आमची चूलही पेटणार नाही. आम्ही करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जात होता.

शासनाने घोषित केलेला ‘ब्रेक द चेन’ नव्हे तर ‘ब्रेक द लाइफ’ ठरू पाहत आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून सर्व व्यापारी त्रस्त झाले आहेत. कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा स्थितीत पुन्हा लाॅकडाऊन केले जात आहे. शासनाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही दुकाने उघडू. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासनानेही सहानुभूतीपूर्वक विचार करून या लाॅकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्याची गरज आहे. असे झाले नाही तर आंदोलन तीव्र करू.-मयूर बिसेन, जिल्हाध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या