शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

हजारो दमा रुग्णांनी घेतला औषधाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 9:24 PM

दमा रुग्णाला नि:शुल्क वनौषधी मिळत असल्याने व त्याचा लाभ होत असल्यामुळे दमा आजार असलेल्या हजारो रुग्णांनी औषधाचा कोजागिरी पोर्णिमेच्या पर्वावर लाभ घेतला.

ठळक मुद्देअड्याळ मंदिरात उपक्रम : गर्दीमुळे जागाही पडली अपुरी

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : दमा रुग्णाला नि:शुल्क वनौषधी मिळत असल्याने व त्याचा लाभ होत असल्यामुळे दमा आजार असलेल्या हजारो रुग्णांनी औषधाचा कोजागिरी पोर्णिमेच्या पर्वावर लाभ घेतला. अड्याळ येथील प्रसिद्ध व जागृत हनुमंत देवस्थान परिसरात हा उपक्रम पार पडला. देवस्थान पंचकमेटी अड्याळतर्फे मागील दशकभरापासून हा उपक्रम सुरू आहे.शरदपोर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी देवस्थान मंडळातर्फे दमा रुग्णांना मोफत औषध देण्यात येते. या औषधामुळे रुग्ण पुर्णत: बरे झाल्याचे प्रमाण सिद्ध झाल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व अन्य राज्यातूनही रुग्ण येथे येत असतात. दरवर्षी येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दीमुळे मंदिर परिसरातील पटांगणही कमी पडले. मिळेल त्या ठिकाणी उभे राहून रुग्णांनी औषधी प्राप्त केली.यासंदर्भात देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष भाष्करराव पोटवार म्हणाले की, बाहेरून आलेल्या रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही व ते रुग्ण औषध घेतल्याशिवाय जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. बाहेरून आलेल्या रुग्णांना रात्रीच्यावेळी परत जाण्याची सोय नसेल अशा रुग्णांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मागील दहा वर्षांच्या कारकिर्दीत आजघडीला रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. यावर्षी सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आली आहे. यामुळे दमा औषधीवरचा विश्वास वाढत असल्याचेही पोटवार यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी अड्याळवासीयांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.