भासरा व पुतण्याकडून विवाहितेचा विनयभंग
By Admin | Updated: October 20, 2014 23:06 IST2014-10-20T23:06:42+5:302014-10-20T23:06:42+5:30
तालुक्यातील मांडवी येथील भासरा व पुतण्यानेच २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथे घडली. तक्रारीवरुन कारधा ग्रामिण पोलिसांनी चौघांविरुद्ध

भासरा व पुतण्याकडून विवाहितेचा विनयभंग
भंडारा : तालुक्यातील मांडवी येथील भासरा व पुतण्यानेच २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथे घडली. तक्रारीवरुन कारधा ग्रामिण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित महिला पती व दोन मुलीसह मांडवी येथे राहते. वडिलोपार्जित घरी त्यांच्या बाजूला तिचा भासरा कुटुंबासह राहत होता. मात्र भासऱ्यानेच काही दिवसापूर्वी वडिलोपार्जीत घर स्वत:च्या नावाने करून तिच्या पतीला घर सोडून जाण्यासाठी तगादा लावला होता. तिचा पती गावात पानठेला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी सकाळी तो पानठेल्यावर गेला असता त्यावेळी त्याच्याकडे लहान मुलगी आली व मोठे वडील तिच्या आईला मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्त्यानंतर तो घरी गेला असता त्याचा मोठा भाऊ, त्याची दोन्ही मुलांनी तिला जबर मारहाण करीत होते.
पीडित महिलेने या चौघांनीही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला व जबर मारहाण केल्याचे पतीजवळ सांगितले. एवढ्यावरच ते चौघे न थांबता त्यांनी विवाहितेला अंगणात आणून मारहाण केली. याप्रकरणी पतीने अत्यवस्थ अवस्थेत पत्नीसह कारधा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्याऐवजी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. पिडीतेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १८ मध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती अत्यवस्थ आहे. पिडीत महिलेचा पती खेमराज बोदीले यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी प्रदीप ताराचंद बोदिले (५५), शुभम प्रदीप बोदिले (१९), उद्रेश प्रदीप बोदिले (२२) व दिगांबर जयपाल मेश्राम (४०) यांच्याविरुद्ध भादंवि ३५४, ३२४, २९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)