शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’चा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल,........

ठळक मुद्देअतिरिक्त कामांवर बहिष्काराचा इशारा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया, स्किनिंग इत्यादी कामे असोत या सर्व कामांचा बहिष्कार केला जाईल, अशी घोषणा आशा कर्मचाऱ्यांच्या मोर्च्यासमोर युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर यांनी केली.मोर्च्याचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा संघटक राजू बडोले व जिल्हा सचिव सुनंदा दहिवले यांनी केले.आशा कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनाच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, शासकीय सेवेत सहभागी करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचारी संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमपणे राबविण्यात यावे, प्रोमोटर्सच्या मोबदल्याचे प्रलंबित बिल द्या, स्टेशनरी पुरवा व विविध कागदपत्राच्या झेरॉक्सचे बिल द्या, ज्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही ते काम ‘आशा’ कडून करवून घेवू नये, जसे एपीएल, महिलांचे बाळंतपण, आयुष्यमान भारत योजना, निप्पी सायरप, आयपीएफ गोळया वाटने, स्किनिंग करने आदी कामे या पुढे आशा कर्मचारी करणार नाही, प्रत्येक मिटींगचा ३०० रुपये भत्ता द्या, आशांना व त्यांच्या कुटूंबियांना आरोग्याच्या सर्व सुविधा द्या, आशांना मानधन दिल्या जाणाºया बँकेतून कर्ज पुरवठ्याची सोय करा व गोवर रुबेला कामाचा मोबदला द्या आदी मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे देण्यात आले.सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लतिका गरुड यांनी स्विकारले. त्यांनी स्थानिक मागण्या मान्य करुन मानधन वाढीच्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, हिवराज उके, सुनंदा दहिवले, भूमिका वंजारी, आशिषा मेश्राम, साधना बडोले, सविता नारनवरे, डाकरे आदींचा समावेश होता.शेवटी शिवकुमार गणवीर यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली तर हिवराज उके यांनी समारोप केला. वामनराव चांदेवार, राजू बडोले व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठया संख्येत जिल्ह्यातील आशा कर्मचारी मोर्च्यात प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा