शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या महापुरात अनेक कुटुंबाची वाताहत

By admin | Updated: November 18, 2014 22:51 IST

लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी

कऱ्हांडला : लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी गावात दारूबंदीचा ठराव घेवून अवैध रेती दारूबंदी केल्यानंतरही पुन्हा दारू विक्री सुरू झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये राजनी गावात भागवत सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दारू बंदीची मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिम राबवली. तोरण पताका लावल्या, सडा साखर करून घरोघरी रांगोळ्या घत्तलून गावात रमणीय, उत्साही, आनंदमय वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गावकरी परमेश्वराचे गजर करत नामचिंतणात दंग झाले होते. अशांत दारूच्या नशेत धुंद असणारांकडून धिंगाणा घालत आनंदात बांधा निर्माण झाली. भागवताच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माणसातील माणूसपणा जागा झाला. उत्साहित झालेल्या समाजाने दारूबंदीसाठी आवाज उठवला. यात विशेष करून महिलांनी पुढाकार घेतला. त्यावेळी भागवताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या प्रवचनकार महिलाच होत्या. दारूच्या विषयावर प्रभावी मार्गदर्शन झाल्याने महिलामध्ये प्रभावी शक्ती जागृत झाली.भागवत सप्ताह स्थळीच रात्रीला ग्राम सभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावातील महिला पुरूषानी भाग घेतला. पन्नास महिलांची दारूबंदी समिती स्थापन करण्यात आली. राजनी गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. ठरावाची सत्यप्रत लाखांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. दारूबंद झाली आणि गावामध्ये चांगले वातावरण निर्माण झाले.राजनी गावामध्ये अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री सुरू आहे. दारूच्या व्यसनात कित्येकाना जीव गमवावा लागला आहे. नवऱ्याविना बायको आणि बापा विना लेकर असे कित्येक कुटूंब त्या गावात निराधाराचे जीवन जगत आहेत. दारूच्या नशेत कित्येकांनी आत्महत्या केली तर कित्येक प्रयत्न करून बचावलेले आहेत. लाखांदुरच्या पोलीस ठाणेदाराकडून नागरिकाची अपेक्षा पूर्ण होण्याची शंकेत दिसत नाही. जिल्हा पोलिसांनी याकडे लक्ष घालून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)