पोलिसांवर लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 10:28 AM2021-12-07T10:28:47+5:302021-12-07T10:32:32+5:30

आरोपी गावातील एका व्यक्तीला शिविगाळ करुन खून करण्याची धमकी देत असताना पोलिसांना आढळून आला. पोलीसांनी आरोपीला हटकले असता त्याने पोलिसांना शिवागळ, धक्काबुक्की करत हातातील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

man tried to attack on police by knife and sickle | पोलिसांवर लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; तरुण अटकेत

पोलिसांवर लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; तरुण अटकेत

Next
ठळक मुद्दे लाखांदूर तालुक्यातील विरलीची घटना

भंडारा : घरगुती वादात समुपदेशनासाठी  गेलेल्या पोलिसांवर एका तरुणाने लोखंडी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली.

विशाल मनोहर तुमाने (३८) रा. विरली बुज. से अटकेतील तरुणाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार, तालुक्यातील विरली(बु) येथील बावला हरिदास मोटघरे या वृद्धेने घरगुती वादावरून मुलगा व सुन मारहाण करीत असल्याची माहिती ११२ क्रमांकावर लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरुन आपत्कालीन पोलीस वाहनासह पोलीस अंमलदार रवींद्र मडावी व सुभाष शहारे घटनास्थाळी दाखल झाले.

वृद्धेच्या कुटुंबियांचे समुपदेशन आटोपून पोलीस वाहनाकडे जात होते. यावेळी विशाल दोन्ही हातात लोखंडी कोयता व चाकू घेवून गावातीलच अन्य एका व्यक्तीला शिविगाळ करुन खून करण्याची धमकी देत असताना पोलिसांना आढळून आला. त्यावरुन पोलीसांनी आरोपीला हटकले असता त्याने पोलिसांना शिवागळ व धक्काबुक्की करत हातातील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना महिती दिली. लाखांदूरचे पोलीस निरिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस नाईक दिलीप भोयर, अंमलदार अनिल राठोड, अविनाश खरोले, मुलगिर, भुपेंद्र बावनकूळे आदी पोलिस अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावून विशालला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात शिविगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार हस्तगत करित त्याला ताब्यात घेतले.  घटनेची माहिती होताच पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतली.

Web Title: man tried to attack on police by knife and sickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.