शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

व्यवसायासाठी मुद्रा कर्ज विनाअट उपलब्ध करू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:00 AM

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मनिषा कुलसुंगे उपस्थित होत्या.

ठळक मुद्देसुनील मेंढे : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वत:चा व्यवसाय उभारू इच्छिनाऱ्या गरीब, गरजू व होतकरू तरूणांना बँकांनी स्वत: पुढाकार घेवून विनाअट मुद्रा कर्ज उपलब्ध करून द्यावे, छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बँकांनी संपर्क करून मुद्रा योजनेत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मनिषा कुलसुंगे उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत यावर्षात ५७१० प्रकरणात ६८ कोटी ६९ लाख रूपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. खासदार मेंढे यांनी कर्ज वितरणाचा बँकनिहाय आढावा घेतला. मुद्रा योजनाही महत्वकांक्षी योजना होती. या योजनेचा अर्ज प्रत्येक बँकेत उपलब्ध ठेवावा. दर्शनी भागात योजनेचा फलक लावण्यात यावा, बँकांनी कुणाची अडवणूक करू नये आणि मुद्रा कर्ज प्रकरण सात दिवसात मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे.या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तावर चर्चाकरून कायम करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायक योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पेयजय योजना, प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना, एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमिअभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सदस्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर कार्यवाही करण्याची सूचना खासदार मेंढे यांनी दिली.कर्जमुक्ती योजनेत ३५ हजार शेतकरी पात्रमहात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात ३५ हजार ३३२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली. ही संख्या दोन लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आहे. यावर खासदार सुनील मेंढे यांनी दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमुक्ती देण्यात यावी, असा ठराव या बैठकीत मांडला आणि तो एकमताने मंजूर झाला.रेती चोरीला आळा घालारेतीअभावी घरकुलांच्या कामांची गती मंदावली आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेने त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश खासदार मेंढे यांनी दिले. रेतीचोरीला आळा घालावा, रेतीघाटांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी संस्था नेमण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. सरकारी बांधकामासाठी रेतीघाट राखीव ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.