मनमुराद दादलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र गॉट टॅलेंट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दि. २० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी भंडारा शहर व परिसरातील ६० हून अधिक कलाकारांनी या मंचावर आपली कला सादर केली. ज्यामध्ये नृत्य, गायन, झुंबा, अभिनय, मिमिक्री अशा विविध कलांचा समावेश होता.लोकमतचे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रणित उके व डिप्पल वाघमारे यांनी राधा-कृष्णाचं नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच निकेश खेताडे यांनी आपल्या नृत्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले.कार्यक्रमाला नगरसेविका जयश्री बोरकर, बेला येथील सरपंच पूजा वाघमारे, पुजा कुंभलकर, रजनी उजवणे, स्व. घनश्याम बहुउद्देशिय संस्थेचे सचिव योगेश पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील प्रतिभावान व्यक्तींना त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची ही एक चांगली संधी मिळाली. व त्यामध्ये कलाकारांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट अशी कला सादर केली.कलर्स चॅनलवर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या मालिकेच्या परीक्षक मंडळामध्ये करण जोहर, किरण खेर, मलायका अरोरा पुन्हा एकदा स्पर्धकांच्या स्वप्नांना वास्तवतेत उतरवण्यासाठी पदार्पण करीत आहेत.हे आठवे सिझन असून, आतापर्यंत गेल्या सात वर्षात खूप मोठी लोकप्रियता संपादन केलेली आहे. मोठ्या संख्येने प्रतिभावान कलाकारांना या मालिकेने समोर आणले आहे.‘वो टॅलेंट ही क्या, जो किसी के काम ना आए’ या नव्या परिभाषेवर ही मालिका मनोरंजनाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. जो नकलाकार रस्त्यावरील वंचित निराधार मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो तीच खरी प्रतिभा अशी व्याख्या या मालिकेची करता येईल.या मालिकेत यावेळचे विशेष आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या तांत्रिक गोष्टींचा यात उपयोग करण्यात येणार आहे. अशी ही मालिका ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ २० आॅक्टोबरपासून शनिवारी आणि रविवारी रात्री १० वाजता कलर्स चॅनलवर प्रसारित होणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार विजेते - नृत्यप्रथम - विशाखा जिभकाटेद्वितीय - शुभम शेंडेतृतीय - अपर्णा किटेप्रोत्साहनपर - निधी मेश्राम,जान्हवी ढबालेपुरस्कार विजेते - गायनप्रथम - डेव्हीड भालाधरेद्वितीय - अमन अतकरीतृतीय - पराग झिंगरे,भूषण भुरेप्रोत्साहनपर - सुचिता गायधने,अश्विनी गाजीमवारइतर पुरस्कार विजेतेप्रथम - सीमा झंझाडद्वितीय - कल्पना शेट्टीतृतीय - कविता डान्स ग्रृपप्रोत्साहनपर - चाहुल नागपुरे,दिलीप करटकर
‘महाराष्ट्र गॉट टॅलेंट’मध्ये कलाविष्कारांची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:14 IST
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र गॉट टॅलेंट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दि. २० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
‘महाराष्ट्र गॉट टॅलेंट’मध्ये कलाविष्कारांची भुरळ
ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि कलर्स प्रस्तुत : ‘वो टॅलेंट ही क्या जो किसीके काम न आये’ म्हणत प्रेक्षकांकडून