शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

Maharashtra Election 2019 ; साकोलीतील चोरीने तालुका बँकांची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM

अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सोने असा एक कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कुचकामी : लाखोंची रोकड व गहाणातील सोने वाऱ्यावर

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तब्बल एक कोटी ९२ लाखांची चोरी उघडकीस आल्यानंतर तालुकास्तरावरील विविध बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तकलादू इमारती, सुरक्षा रक्षकांचा अभाव आणि कुचकामी ठरणारी सीसीटिव्ही यंत्रणा चोरट्यांसाठी चांगलेच फावत आहे. साकोलीच्या घटनेने बँकातील ग्राहकांची लाखोंची रोकड आणि गहाणातील सोने वाºयावर तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरूवारच्या रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बनावट चाबीने लॉकर आणि इतर कुलूपे उघडली. बँकेतील २४ लाख ५५ हजार रूपयांची रोख आणि चार किलो २०० ग्रॅम सोने असा एक कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यात आजपर्यंत एवढ्या मोठ्या रक्कमेची चोरी झाली नव्हती. जवळपास दोन कोटी रूपये हातोहाथ तेही बँकेच्या लॉकरमधून चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विविध राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकाच्या शाखा आता तालुकास्तरावर आहेत. विशेष सुविधा नसतानाही बँकांनी आपल्या शाखा तालुकास्तरावर सुरू केले आहे. एखादी इमारत भाड्याने घेवून त्यात बँक थाटली जाते. तेथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना नसतात. गावापासून दूर शाखा असतात. याठिकाणी दिवसभर याठिकाणी सुरक्षा रक्षक असला तरी रात्रीच्यावेळी येथे कुणीही नसते. सीसीटिव्हीच्या भरोशावर लाखो रूपयांची रोकड बँकांमध्ये असते. साकोली येथेही असेच झाले. रात्री कुणीही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले. चोरट्यांनी कोणताही पुरावाही मागे ठेवला नाही. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र तोही माग दाखवू शकला नाही.जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्वांनीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र उशिरा रात्रीपर्यंत चोरट्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नव्हता. साकोली येथील चोरीने तालुका ठिकाणावरील बँका किती असुरक्षित आहे, याचा अंदाज येतो. तालुकास्तरावरी बँकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. ग्राहकांचे लाखो रूपयांचे वाºयावर दिसतात.विर्शी बँकेतील चोरीचा शोध नाहीसाकोली तालुक्यातील विर्शी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वर्षभरापुर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला. बँकेचे लॉकर बाहेर शेतात नेवून गॅसकटरच्या सहायाने तिजोरी फोडली. लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला. मात्र अद्यापही या चोरीतील चोरट्यांचा शोध लागला नाही. एक वर्ष होवूनही चोरी उघडकीस आली नाही. आता पुन्हा साकोलीत ही घटना घडल्याने पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.बनावट चाबीचे रहस्य कायचोरट्यांनी साकोलीच्या बँकेतून बनावट चाबीच्या सहायाने लॉकरचे कुलूप उघडले. बनावट चाबी तयार करण्यामागे रहस्य काय, यात कुण्या बँकेतीलच व्यक्तींचा सहभाग तर नाही ना, असा संशय येत आहे. कोणत्याही बँकेत स्ट्राँग रूममध्ये अनोळखी व्यक्ती पोहचली की सायरन वाजतो. परंतु साकोलीच्या भर वस्तीत असलेल्या बँकेत चोरी करून चोरटे निघून गेले तरी सायरन वाजला नाही. बँकेचे व्यवस्थापक हलिंद्र बोरकर नियमित वेळेवर बँकेत आले तेव्हा चोरी झाल्याचे उघडकीस आले. यामुळे आता पोलीस नेमका कोणत्या दिशेने या घटनेचा तपास करतात आणि चोरटे कसे जेरबंद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Thiefचोर