शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: February 19, 2016 01:08 IST

प्रेमविवाहाला घरचा होत असलेला विरोध बघून एका प्रेमीयुगलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र

मोहाडी : प्रेमविवाहाला घरचा होत असलेला विरोध बघून एका प्रेमीयुगलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीने उपचार करण्यात आल्याने त्या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील एका युवक-युवतीचे एकमेकांवर प्रेम हाते. त्यांचे प्रेम प्रकरण अनेक दिवसापासून सुरू होते याची चाहुल मुलीच्या वडिलांना लागताच त्यांनी या दोघांच्या लग्नाला विरोध केला. हे प्रेमीयुगल एकाच समाजाचे असल्याने त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला. मात्र मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळवून घेतले. याची माहिती प्रियकराला होताच त्याने मुलीला जाब विचारला. मुलगीही वडिलांनी ठरविलेल्या लग्नाच्या विरोधात असून प्रियकरासोबत लग्नाला तयार झाली. मात्र पळून लग्न करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. शेवटी त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीला घरी बोलावले. घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून दोघांनीही विषप्राशन केले. विष घेतल्याने दोघेही बेशुद्ध झाले. घराला कुलूप असल्याने कोणाचेही लक्ष गेले नाही. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने शोधाशोध सुरू झाली. संशय आल्याने मुलाच्या घराच्या मागच्या दाराने प्रवेश केला असता दोघेही बेशुद्ध स्थितीत आढळून आले. त्यांना त्याच स्थितीत बाहेर काढून जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)