शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:49 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : राजकीय नेत्यांची गर्दी ओसरली, अधिकाऱ्यांनी टाकला डेरा

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत २२ विश्रामगृह व विश्रामभवन आहेत. यात भंडारा येथे असलेल्या विश्राम भवनात वातानुकुलीत सहा सुट आणि साधे चार सुट आहेत. तसेच लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे प्रत्येकी दोन सुट आहेत. निवडणुकीची घोषित होताच १० मार्चपासून आचारसंहिता लागू होते. राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने, सामान्य जणांसह विशेषांकडे असणारी शस्त्रेही जमा करावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी दंगा धोपा होईल अशी कृत्ये किंवा हरकतींवर प्रशासनाची करडी नजर असते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व परिसरात कुठलाही उमेदवार सभा किंवा कार्यक्रम घेऊ शकत नाही. संबंधित विश्रामगृहाचे सूट केवळ निवडणूक कार्यात सहभागी असणारे अधिकारी, सतर्कता समिती याशिवाय भरारी पथकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर भेट देणारे अधिकारीसुद्धा याच विश्रामगृहात निवडणुका संदर्भाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या कारणाने गजबजलेले विश्रामगृह परिसरात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्तेही येथे भटकत नाही. मान्यता नसल्यामुळे सभाच होत नाही तर जायचे कशाला? अशीही खुसफूस ऐकायला मिळत आहे.साकोली तालुक्यात लाखो रुपये खर्चून विश्रामगृहाची प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात आले. येथे दोन सुट उपलब्ध आहेत, मात्र अनेक वर्षापासून त्याठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृह शोभेची वास्तू ठरत आहे. साकोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागझिरा अभयारण्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवेगावबांध येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. मात्र येथे कर्मचारी नसल्याचे कारण समोर करुन पर्यटकांचा हिरमोड केला जात आहे.प्रवेशव्दारावर सूचना फलकभंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत एकुण २२ विश्रामगृह व विश्राम भवनाच्या प्रवेशव्दारावर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार सुचना फलक लावण्यात आले आहे. या फलकावर १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने जिल्ह्यातील सर्व विश्रामभवन, गृहाचे आरक्षण जिल्हाधिकाºयांच्या परवानगी शिवाय देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय सभा, बैठक घेण्यास प्रतिबंध असल्याचे नमूद आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक