शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM

सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आणि संवर्धनावर खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

ठळक मुद्देपाण्याअभावी अनेक झाडे कोमेजली : देवसर्रा येथील अनेक वृक्ष झाले नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वनविभागाने पर्यावरण संतुलनासाठी अनेक योजना अंतर्गत सिहोरा परिसरात शासकीय जागेत वृक्ष लागवड केली आहे. परंतु लॉकडाऊन कालावधीत या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यात आले नाही. यामुळे अनेक झाडे नष्ट झाली आहेत.सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आणि संवर्धनावर खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु उन्हाळ्याच्या महिन्यात कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यानंतर एप्रिल महिन्यात कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. या महिन्यात बहुतांश शासकीय कार्यालय बंद करण्यात आली. घराबाहेर नागरिक आणि मजुरांचे बाहेर पडणे बंद झाल्याने वनविभागाचे यंत्रणेने फिरकणे बंद केले होते. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नर्सरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या कालावधीत लागवड वृक्षांना पाणी वाटप, केरकचरा काढणे, खत आणि जतन करण्यात आले नाही.या कालावधीत मजूर मिळणे कठीण होते. यामुळे लॉकडाऊनचा फज्जा या नर्सरींना बसला आहे. देवसर्रा गावाचे हद्दीत असणाऱ्या राठी विद्यालयाचे मागील भागात तयार नर्सरीत एकही झाड जीवंत नाही. ही नर्सरी कंत्राटदाराने तयार केली आहे. परंतु मजूर मिळाले नसल्याने झाडांना पाणी देण्यात आले नाही. याशिवाय हरदोली गावांचे गाव शिवार हद्दीत तयार नर्सरीत सागवन रोपवन तयार करण्यात आले आहे. ही झाडे केरकचऱ्यांनी तुंबली आहेत.मजुरांचा तुडवडा आणि लॉकडाऊनमुळे झाडांचे जतन आणि संवर्धन अडले आहे. फिजीकल डिस्टन्सिंग अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करण्याचे सांगण्यात येत असले तरी ग्रामीण भागात कुणी ऐकायला तयार नाहीत. रोहयो कामावर फिजीकल डिस्टन्सिंग पूर्णत: फज्जा उडाला असून लॉकडाऊनमुळे वनविभागाचे नर्सºया कोमेजल्या आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग