शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे बांधकाम न करताच केली अनुदानाची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 05:00 IST

लाखांदूर पंचायत समितींतर्गत घरकूल बांधकाम योजनेचे अभियंता गजभिये संबंधित महिला लाभार्थ्याच्या घरकुलाच्या पायाचे बांधकाम पाहावयास गेले असता लाभार्थी महिलेच्या कुटुंबीयांनी गावातीलच अन्य एका लाभार्थ्याच्या घरकूल बांधकामाचा पाया दाखवून दुसऱ्या हप्त्याच्या निधीची मागणी केली. त्यानुसार अभियंता गजभिये यांनी स्थानिक ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र मागवीत दुसऱ्या हप्त्याचे अनुदान निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले. 

ठळक मुद्देमांढळ येथील घटना : शासन-प्रशासनाची केली दिशाभूल, कारवाइ करण्याची ग्रामस्थांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करता लाभार्थी ग्रामसेवक व रोजगार सेवकाने संगनमताने शासन, प्रशासनाची दिशाभूल करीत चक्क दोन धनादेशाची उचल केल्याची खळबळजनक माहिती आहे. सदर घटना तालुक्यातील मांढळ येथे उघडकीस आली असून या घटनेत दोषी लाभार्थ्यांसहित अधिकारी कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांत केली जात आहे. माहितीनुसार, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना २०२० - २१ अंतर्गत तालुक्यातील मांढळ येथील अंजना गोविंदा नंदनवार  नामक लाभार्थी महिलेला घरकूल मंजूर करण्यात आले. सदर मंजुरी अंतर्गत शासनाकडून अग्रीम २० हजार रुपयांचा निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. सदर निधींतर्गत लाभार्थ्याला घरकुलाच्या पायाचे बांधकाम करावयाचे होते. मात्र लाभार्थ्याने पायाचे बांधकाम केले नाही.  लाखांदूर पंचायत समितींतर्गत घरकूल बांधकाम योजनेचे अभियंता गजभिये संबंधित महिला लाभार्थ्याच्या घरकुलाच्या पायाचे बांधकाम पाहावयास गेले असता लाभार्थी महिलेच्या कुटुंबीयांनी गावातीलच अन्य एका लाभार्थ्याच्या घरकूल बांधकामाचा पाया दाखवून दुसऱ्या हप्त्याच्या निधीची मागणी केली. त्यानुसार अभियंता गजभिये यांनी स्थानिक ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र मागवीत दुसऱ्या हप्त्याचे अनुदान निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा केले. दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत घरकूल बांधकाम होताना अकुशल कामाअंतर्गत दिली जाणारी देयकेदेखील लाभार्थ्याला देण्यात आल्याची माहिती आहे. या संबंधित घटनेत लाभार्थी, ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी शासन, प्रशासनाची संगनमताने दिशाभूल करून घरकुलाचे बांधकाम न करता जवळपास ८० हजार रुपयांचा निधी उचल केल्याची माहिती देण्यात आली आहे. शासन, प्रशासनाची संगनमताने दिशाभूल करून अनुदानाची उचल केल्याप्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करणार घरकुलाचे बांधकाम न करता शासन, प्रशासनाची दिशाभूल करून शासन निधीची उचल केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती लाखांदूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद वानखेडे यांनी दिली. आता कारवाइकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना