शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

भंगार एसटीतून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थितीत गंतव्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनाही अधिकचा वेळ खर्ची घालावा लागतो.

ठळक मुद्देचालकांना मनस्ताप : प्रवाशांचेही हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य अंगीकारणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसेसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. खळखळ वाजणाºया एसटी बसमधून प्रवास करताना आपण सुरक्षित आहोत काय, असा सवालही प्रवाशी विचारीत आहे. सोमवारी दुपारी असाच प्रकार जिल्हा परिषद चौकातील प्रवाशी निवाºयावर उतरलेल्या प्रवाशांनी अनुभवला.
भंडारा येथे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. मात्र प्रवाशांच्या सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. भंगार बसेसचा वापर अजुनही सुरूच असल्याने रस्त्यातच एसटी बस बंद पडणे, धक्का मारणे आदी समस्यांचा सामना चालकांना करावा लागतो. अशास्थितीत गंतव्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनाही अधिकचा वेळ खर्ची घालावा लागतो.
सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद चौकातील प्रवाशी निवारा येथे तुमसर मार्गाहून आलेल्या एका एसटीमधून प्रवाशी उतरले. यात अनेक वृद्ध प्रवाशी असल्याने भंगार बसचा अनुभव त्यांनी कथन केला.

वायफाय सेवेचे तीनतेरा
एसटी बसमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय सेवेचा फायदा घेता येईल, असे बोर्ड दिसून येतात. मात्र सदर वायफाय सेवेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येते. बहुतांश बसमध्ये ही सुविधा कार्यरत नाही. अग्निशमन यंत्रे धुळखात पडली आहेत. प्राथमिक कीट पेटीही अनेक दिवसांपासून बदलविण्यात येत नाही. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षीत प्रवास असे म्हणणाºया महामंडळावरच विचार मंथन करण्याची वेळ आली आहे. बसस्थानकातही सुविधांचा अभाव असून भंडारा येथील बसस्थानक परिसरात खड्ड्यांची भरमार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक