भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटाच्या बछड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:07 IST2023-03-19T14:07:17+5:302023-03-19T14:07:53+5:30
मार्ग ओलांडून जाताना ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.

भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटाच्या बछड्याचा मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : साकोलीपासून काही अंतरावर रविवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. मार्ग ओलांडून जाताना ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.
सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. महामार्ग ओलांडून हा बछडा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असता अज्ञात ट्रकने त्याला चिरडले. डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने जागीच बछड्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी बछड्याचे शव ताब्यात घेऊन पंचनामा केला. हा बछडा अंदाजे १ वर्षाचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.