शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनो शहरात मोटारसायकलने फेरफटका मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ‘नेत्यांनो शहरातील रस्त्यांवरून मोटारसायकलने आणि तेही आपल्या कुटुंबाला घेऊन एकदा फेरफटका माराच. तेव्हाच तुम्हाला ...

ठळक मुद्देसोशल मीडियावर सवाल : अलीशान चारचाकी वाहनातून खड्डे व चिखलाने माखलेले रस्ते दिसतील तरी कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘नेत्यांनो शहरातील रस्त्यांवरून मोटारसायकलने आणि तेही आपल्या कुटुंबाला घेऊन एकदा फेरफटका माराच. तेव्हाच तुम्हाला रस्त्यांचे वास्तव कळेल. अलीशान चारचाकी वाहनातून रस्त्यावरील खड्डे आणि चिखल दिसणार तरी कसा’ असा उद्विग्न सवाल सर्वसामान्य सोशल मीडियातून करीत आहेत. भंडारा शहरातील रस्त्यांचे झालेले हाल पाहता सर्वसामान्यांच्या भावना कुणीच जाणून घेत नाहीत. नेत्यांना काही सोयरसुतक नाही, असेच यातून दिसत आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सध्या रस्ते आहेत की नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळी दिवसात शहरातील प्रत्येक रस्ता उखडला असून अंतर्गत रस्त्यांचे तर हाल विचारायला नको. कोणत्याही रस्यावरून फेरफटका मारा. खड्ड्यातून गेल्याशिवाय पर्यायच नाही. राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा परिषद चौक ते बहिरंगेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गाचा अपवाद वगळला तर शहरातील एकही रस्ता सुस्थितीत दिसत नाही.नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु पावसाळा आला की या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडतात. त्यातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. सातत्याने खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत. विविध माध्यमातून या रस्त्यांचे हाल प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न झाले, परंतु साधी डागडुजीही करण्याचे कुणी मनावर घेतले नाही. त्याच मार्गावरून शहरातील सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.शहरातील बहिरंगेश्वर मंदिर ते लाल बहादूर शास्त्री चौक रस्त्याला रस्ता म्हणावे की नाही अशी अवस्था झाली आहे. गत तीन महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. याच मार्गावरुन अवजड वाहतुकही सुरु असते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यात पाणी साचून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौकातील रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. वारंवार डागडुजी करुनही हा रस्ता पावसात उखडतो. त्यावर कायम उपाययोजना होताना दिसत नाही.हा सर्व प्रकार शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना दिसत नसावा असेच आता म्हणावे लागेल. रस्त्यांची अवस्था पहायची असेल तर नेत्यांनी शहरातील रस्त्यांवर दुचाकीने तेही आपल्या परिवारासह फेरफटका मारून दाखवावा असा सवाल सोशल मीडियातून केला जात आहे. शहरातील रस्त्यांचे नेमके वास्तव अलीशान चारचाकी वाहनातून दिसणार नाही. त्यासाठीच नेत्यांनी एकदा तरी मोटरसायकलने फेरफटका मारून वास्तव अनुभवण्याची गरज आहे.नवीन वसाहतीत चिखलमय रस्तेशहरालगत अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. विकसकांनी रस्ते, पाणी, नाल्या आदी सुविधा देण्याचे आमीष दाखवून या परिसरातील घरे ग्राहकांना विकली. मात्र आता अनेक वसाहतीत जाण्यासाठी रस्तेच नाहीत. कच्चे रस्ते पावसाने चिखलमय झाले आहेत. पाऊस गेल्यानंतरही आठ-दहा दिवस या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण होते. अनेकांना तर आपली वाहने दुसºयाच्या घरी ठेवून चिखल तुडवत घर गाठावे लागते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक