शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थरावर थर रचा, पण नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनियमांकडे दुर्लक्ष : अपघाताची नोंद नाही, मात्र सुरक्षा साधनांचा अभाव, तरुणांमध्ये वाढते क्रेझ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्सवप्रिय भंडारा जिल्ह्यात वर्षभर विविध उत्सवाचे आयोजन केले जाते. जन्माष्टमी अर्थात कान्होबाच्या मुर्तीची स्थापना घरोघरी केली जाते. दोन दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. अलीकडे दहीहंडीची क्रेझ तरुणात वाढू लागली आहे. उंच असलेली दहीहंडी फोडण्यासाठी चुरस दिसून येते. शहरात दोन ठिकाणी सार्वजनिक आणि काही शाळांमध्ये दहीहंडीचे आयोजन केले जाते. नियमांकडे दुर्लक्ष होत असले तरी कुठेही आतापर्यंत अपघात मात्र घडला नाही. सुरक्षा साधनांचा अभाव दिसत असला तरी मंडळांचे पदाधिकारी मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करतांना दिसत आहे. पोलीसही यावर करडी नजर ठेवून असतात.भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. अलिकडे शहरानजीकच्या गणेशपूर येथेही व्यापक प्रमाणात दहीहंडी आयोजित केली जाते. लाखो रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोंविदांचे पथक सज्ज असतात. लहान मुलांपासून तरुणापर्यंत थरावर थर रचतात. अनेकदा थर खचून किरकोळ अपघात होतात. परंतु आजपर्यंत कुणी गंभीर जखमी झाला नाही. गत काही वर्षाचा आढावा घेतला तर गांधी चौकातील दहीहांडीच्यावेळी झालेला गोंधळाचा प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार झाला नाही.गणेशपूरमध्ये १ लाख ११ हजाराचे बक्षीसभंडारा शहरात जलाराम मैदान आणि गणेशपूर परिसरात यंदा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूर येथे श्वास फाऊंडेशनच्या वतीने मिशन हायस्कूलच्या प्रांगणात दहीहंडी आयोजित आहे. त्यासाठी १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्थानिक गोविंदा पथकानी बक्षीस जिंकण्याची जय्यत तयारी चालविली आहे. भंडारा येथील दहीहंडीला अद्यापही कार्पोरेट लुक आला नाही. धार्मिकतेच्या भावनेतूनच दहीहांडीचे आयोजन केले जाते. खेळीमेळीच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव पार पडतो. साधारणत: सहा थर रचले जातात. यासाठी श्वास फाऊंडेशनने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या असून पोलीस विभागाची रितसर परवानगी घेतली आहे. आता कोण दहीहंडी फोडतो याची उत्सुकता आहेतीन वर्षात कुठेही अपघात नाहीभंडारा शहरासह जिल्ह्यात दहिहंडीचा उत्सव साजरा करताना गत तीन वर्षात कुठेही अपघात झाला नाही. मंडळाचे पदाधिकारी सर्व नियमांचे काटेकोर पालन करताना दिसतात.दहीहंडीचा उत्सव साजरा करताना सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे. दहीहंडीसाठी सुरक्षीततेची नियमावली आहे. लहान मुलांना सर्वात वरचा थरावर नेणे टाळावे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत.- विश्वास नांगरे पाटील,पोलीस आयुक्त.भंडारा शहरात यंदा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जातात. साहसी क्रीडा प्रकार म्हणून दहीहंडीकडे बघीतले जाते. शहरात अद्यापपर्यंत कोणतीही दुर्घटना सुदैवाने घडली नाही.- संजय कुंभलकर,श्वास फाऊंडेशन, भंडारा

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी