शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मंडईतील दंडारीला लागली अखेरची घरघर

By admin | Updated: November 3, 2014 23:20 IST

दिवाळीनंतर गावागावात मंडईच्या प्रसंगी होणारी विदर्भातील प्राचीन लोककला दंडारीला अखेरची घरघर लागली आहे .नुकत्याच सानगडी येथे झालेल्या मंडई उत्सवात नेहमी पेक्षा दंडार कलापथकाने

पुरुषोत्तम डोमळे - सानगडीदिवाळीनंतर गावागावात मंडईच्या प्रसंगी होणारी विदर्भातील प्राचीन लोककला दंडारीला अखेरची घरघर लागली आहे .नुकत्याच सानगडी येथे झालेल्या मंडई उत्सवात नेहमी पेक्षा दंडार कलापथकाने सहभाग न घेतल्याचे दिसून आले. विदर्भात दिवाळीनंतर पाडव्यापासून गावागावात मंडई नावाचा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या लोकोत्सवात दंडार ही लोककला प्रामुख्याने सादर केली जाते. त्यातील स्त्री वेषधारी पुरुषांच्या हातात टाळ घेवून ढोलकी व शाहीरी गाण्याच्या तालावर नाचणारा नाच आणि सोंग सगळ्यांना मंत्रमुग्ध करीत असते. आता स्त्री वेष धारण करणारी, सोंग धारण करणारी माणसे व मुले मिळेनासी झाल्याने मोठी परंपरा असलेली दंडार मागे पडत आहे. जुन्या ग्रामीण जनमाणसावर दंडारीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे दंडार हा शब्द वाच्यार्थासोबत लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ घेवूनही पदोपदी कानावर पडत असतो. कारण गावातील अठरापगड जातीचा स्वेच्छा सहभाग दंडारीत दिसून येतो. दंडारीत सोंगाडे, नाचे, गाणारे, त्यांना साथ देणारे साथीदार, ढोलकी, तुणतुणेवाले, मेकपवाला, पडदेवाला अशी कामे करणारी मोठी जंत्रीच असते. मात्र आता ही जंत्री एकसंघ राहत नसल्याने वैभवशाली दंडारीला अवकळा आली आहे. पूर्वी दंडार म्हणजे गावाचे व मोहल्ल्याचे वैभव समजले जात असे. तिला पाटील, श्रीमंत, महाजनांचा मोठा गावाश्रय होता.दिवाळीनंतर होणाऱ्या मंडई जलशात खडी दंडार प्रामुख्याने दाखविली जाते. दंडारीत गणानंतर खडे सोंग व झडत्या सुरु होतात. प्रत्येक सोंगानंतर लावणीसह नाच हा असतोच. खडे सोंग किंवा प्रसंग नाच आणि झडती अशा प्रमाणे दंडारीचा कार्यक्रम प्रेक्षकांची नाडी पकडून पुढे जात असते. ग्रामीण प्रेक्षकही कोणताच आडपडदा न ठेवता खद्खदून सअत असतात. परंतु आता दंडारीची प्रेक्षकांवरील पकडही विविध कारणावरून ढिली होत आहे. ही पकड कायम करण्यासाठी दंडारीचा पारंपारिक बंध सोडून आधुनिक टाईम मॅनेजमेंट दंडारकर्त्यांनी साधावे असा सल्लाही काही प्रेक्षक आता देत आहेत.शासकीय स्तरावर या लोककलेची मोठी उपेक्षा असल्याने ही कला लुप्त होत आहे. विदर्भात दिवाळीनंतर सतत १५ दिवस मंडईच्या रुपगाने दंडार नाटकांचा जल्लोष असतो. मात्र या जल्लोषावरही आता भोंगा बंदीने विरजण घातले आहे.