तुमसरच्या राष्ट्रीयीकृत बँकेत सोईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:31+5:30

बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रदीप हंबर्डे यांच्याशी शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने खातेदारांच्या समस्येबाबत नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. ओल्या दुष्काळाचे सावट असून बाजारात आर्थिक मंदी आहे. व्यापारी चिंतेत आहेत. बँकेतील पैसे काढून संसाराचा गाढा हाकण्याचा त्यांचा प्रत्यय आहे. पैशाकरिता नागरिक बमकेत दररोज येतात, परंतु त्यांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.

Lack of facilities at Tumsar's nationalized bank | तुमसरच्या राष्ट्रीयीकृत बँकेत सोईसुविधांचा अभाव

तुमसरच्या राष्ट्रीयीकृत बँकेत सोईसुविधांचा अभाव

ठळक मुद्देखातेदारात असंतोष : शिवसेना शिष्टमंडळाची बँक व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहराच्या मध्यभागी असलेल्या बँक आॅफ इंडिया राष्ट्रीयीकृत बँकेत मोठ्या प्रमाणात असुविधा असून त्याचा खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात ई बँकिंग, वाहनांची पार्किंग, वरिष्ठ नागरिकांची स्वतंत्र रांग नाही. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त, खातेदारांच्या पासबुक नोंदी, कर्ज देण्यास टाळाटाळ इत्यादी बाबींचा समावेश आहे.
बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रदीप हंबर्डे यांच्याशी शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने खातेदारांच्या समस्येबाबत नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. ओल्या दुष्काळाचे सावट असून बाजारात आर्थिक मंदी आहे. व्यापारी चिंतेत आहेत. बँकेतील पैसे काढून संसाराचा गाढा हाकण्याचा त्यांचा प्रत्यय आहे. पैशाकरिता नागरिक बमकेत दररोज येतात, परंतु त्यांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.
रामकृष्ण नगरात सदर शाखा आहे. येथे ई-बँकींग नाही. खातेदारांच्या पासबुकची नोंद होत नाही. ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र रांग नाही. त्यामुळे खातेदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिजर्व बँकेने नियमाप्रमाणे सर्व बँकांना कामकाजाची वेळ निश्चित ठरवून दिली आहे, परंतु काही बँका या नियमांचे पालन करीत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. खातेदारांना बँकेत त्रास यापुढे झाला तर संबंधित कर्मचाºयांसह व्यवस्थापकांना शिवसेना काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, तरुण बेरोजगार समितीचे संयोजक अमित मेश्राम, महिला आघाडी प्रमुख रेखा आंबीलढुके, प्रवीण गुप्ता, नितेश वाडीभस्मे, शाखा प्रमुख राहुल बाणासुरे, निखीलेश गजभियेसह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Lack of facilities at Tumsar's nationalized bank

टॅग्स :bankबँक