भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 10:08 IST2019-05-18T10:05:19+5:302019-05-18T10:08:56+5:30

रोहा वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली.

labour died due to JCB in Bhandara | भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू

भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देअवैध रेती उत्खनन बेतले जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: रोहा वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवनीत सिंदपुरे हा आपला मित्र चेतन उके याच्यासोबत शुक्रवारी रात्री नदीपात्रात गेला होता. तेथे सुरु असलेल्या अवैध उत्खननात जेसीबीचा पंजा डोक्याला लागल्याने नवनीत जागीच ठार झाला. नवनीत सिंदपुरे ९ व्या वर्गात शिकत होता. काल आपल्या आजोबा कडे रोहा येथे आला होता.

 

Web Title: labour died due to JCB in Bhandara

टॅग्स :Deathमृत्यू