मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहराचे प्रवेशद्वार खापा चौक जड वाहतुकीचे वाहन तळ बनले आहे. रामटेक - गोंदिया व तुमसर - भंडारा सह आंतरराज्यीय कटंगी वारासिवनी मार्गाला जोडणारा एकमेव राज्यमार्ग आहे. खापा चौकात सायंकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत ट्रकांच्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा राहतात. अपघाताला आमंत्रण अशी स्थिती येथे राहते. उपप्रादेशिक परिवहन विभाग तथा पोलीस यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत येथे दिसत आहेत.खापा चौक हे राज्यमार्ग क्रमांक २४९ व २७९ वर आहे. तुमसर शहराचे हे प्रवेशद्वार आहे. याच चौरस्त्यावरून भंडारा, गोंदिया, रामटेक, मनसर, वारासिवनी, कटंगी मार्गे वाहने धावतात. खापा-गोंदिया-रामटेक-भंडारा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. नुकतेच रामटेक-गोंदिया हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. सदर रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. येथील रस्त्यालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने सर्रास उभी केली जातात. प्रवाशी वाहने व मालवाहक ट्रक यांची संख्या मोठी राहते. खापा चौकात ढाब्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान रात्रीच्या जेवणाकरिता जड वाहतुकदार व प्रवाशी वाहनातील प्रवाशी येथेच भोजन करण्याला प्रथम पसंती देतात. राज्यमार्गाच्या दुतर्फा उभ्या ट्रकमुळे इतर प्रवाशी वाहनांना धोक्याची शक्यता बळावली आहे.खापा चौकासमोर रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे रस्त्याशेजारील वाहने दिसत नाही. काही जड वाहतूक करणारे ट्रक मागे पुढे करताना धोक्याची शक्यताा निश्चितच आहे. रात्री दरम्यान खापा येथील वाहनांचा अवैध थांबा निश्चितच अपघाताला आमंत्रण देणारी स्थिती निर्माण करीत आहे. खापा चौकातील अस्थायी पोलीस चौकी नाममात्र असल्याचे दिसून येते. वाहतूक नियंत्रण विभागाचे अवैध थांब्यावर नियंत्रण नाही. स्थायी वाहतूक नियंत्रण कक्ष येथे स्थापन करण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग येथे मूग गिळून गप्प दिसत आहे.तुमसर मार्गे मध्यप्रदेशातील कटंगी व वारासिवनीला जाणारा खापा हा मुख्य चौरस्ता आहे. थांब्यावरील जड वाहतुकीची येथे कुणीच दखल घेताना दिसत नाही. चौकशी नाही. साधी विचारपूस कुणी करीत नाही.महाराष्ट्राच्या उत्तरीय सीमेस शेवटचा तालुका म्हणून तुमसरची ओळख आहे. सध्या मध्यप्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अवैध दारु व काळा पैसा पुरवठा संदर्भात संबंधित विभागाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने येथे गंभीर दखल घेण्याची गरज आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अशी छाप असणाऱ्या अधिकाºयांनी आपली भूमिका बजावण्याची गरज आहे.
प्रवेशद्वार खापा चौक झाले ‘ट्रान्सपोर्ट हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:41 IST
तुमसर शहराचे प्रवेशद्वार खापा चौक जड वाहतुकीचे वाहन तळ बनले आहे. रामटेक - गोंदिया व तुमसर - भंडारा सह आंतरराज्यीय कटंगी वारासिवनी मार्गाला जोडणारा एकमेव राज्यमार्ग आहे. खापा चौकात सायंकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत ट्रकांच्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा राहतात. अपघाताला आमंत्रण अशी स्थिती येथे राहते. उपप्रादेशिक परिवहन विभाग तथा पोलीस यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत येथे दिसत आहेत.
प्रवेशद्वार खापा चौक झाले ‘ट्रान्सपोर्ट हब’
ठळक मुद्देराज्य व आंतरराज्यीय रस्ता : प्रवाशांचा जीव धोक्यात, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाचे दुर्लक्ष