शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपाणी वाहते नाल्यातून : उन्हाळी धान पीक संकटात, शेतकरी हतबल

तुळशीदास रावते।लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पांतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून संपूर्ण पाणी नाल्यात वाहून जात आहे. दुसरीकडे पाणी मिळणार नसल्याने धान पीक वाळण्याची भीती आहे. या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हरटॅक होऊन फुटला असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी डबघाईस आला आहे. आता धानाला पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. या कालव्यावर शेकडो एकर ओलीत केले जाते. परंतु आता हे पीक धोक्यात आले आहे. कालवा फुटल्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ कालवा पूर्ववत करावा अशी मागणी आहे.बघेडाच्या सरपंच प्रतिमा ठाकूर म्हणाल्या, सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा कालवा फुटला. शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. २० मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडावे असे त्यांनी सांगितले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले म्हणाले, कालवा फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे पाण्याअभावी शेतकºयांचा धान धोक्यात आला आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करावी.बावनथडी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच जोगीवाडा परिसराला मिळत आहे. काही कारणास्तव कालवा फुटला त्याची तात्काळ दुरुस्ती केल्या जाईल.-एल.डी. सिंग,सहाय्यक अभियंता, तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी