शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

झोडे, मेश्राम यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

राज्य शासनाने सन २०१५-१६ चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली.

जिल्ह्यातील दोघांची निवड : पारदर्शक प्रक्रियेतून निवडभंडारा/जवाहरनगर : राज्य शासनाने सन २०१५-१६ चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. यात जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम पुंडलिक झोडे व कोंढी-जवाहरनगर येथील ग्रामविकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोहर मंगल मेश्राम यांचा यात समावेश आहे.शिक्षण हा समाजाच्या सर्वांगिण विकासाचा पाया आहे. समर्पीतवृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पितवृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाद्वारे निवड करून जाहीर करण्यात आले. यावर्षी शासनाने आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवून शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, शिक्षकांनी लिहिलेले शैक्षणिक संशोधनपर निबंध, वृत्तपत्रात प्रकाशित किमान पाच वैचारिक लेख, शिकवीत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यास कला, विज्ञान, वर्क्तृत्व या क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार, शिक्षकाने स्वत: मिळवलेले विज्ञान प्रदर्शनीतील पुरस्कार शिक्षकाने स्वत: मिळवलेले क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षकाने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी शासनाने दिलेले पुरस्कार, शिक्षकास अल्पबचत, कुटुंब कल्याण, जनगणना, पल्स पोलिओ, रक्तदान आदी राष्ट्रीय कार्यातील कार्यास प्राप्त पुरस्कार, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेली लोकवर्गणी, शिक्षकाने केलेले ग्रंथलेखन, पायाभूत चाचणीतील वर्गाची सरासरी श्रेणी, बालवाचन, ज्ञानरचनावाद, डिजीटल स्कुल, वाचनप्रेरणा, वर्षभरात वर्गातील, शाळेतील मुलांनी किमान किती पुस्तके वाचली, शिक्षकाने राबविलेले विविध उपक्रम आदी विविध क्षेत्रात शिक्षकाने केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन करण्यात आले.विभागीय स्तरावरून वरील निकषात अधिकाधिक गुण प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील दोन पात्र शिक्षकांची निवड करून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. त्यात शिक्षकांनी केलेल्या कार्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यास सांगण्यात आले. तसेच शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा तसेच सामाजिक समता, समरसता, स्त्री पुरुष समानता याबाबत असलेली संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, राष्ट्रीय दृष्टीकोनाबाबद विचार व कार्य, उपक्रम तसेच शिक्षकाचे व्यक्तिमत्व विचारात घेऊन पारदर्शकतेने त्यांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)