शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६१७ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाई आराखडा : १२ कोटी ९० लाखांची कामे प्रस्तावित

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील एकुण ६१७ गावातील ११६३ स्त्रोतांना पाणीटंचाईची झळ सोसण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर १२ कोटी ९० लाख ८१ हजार रुपयांची प्रस्तावित उपाययोजना करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे. जूनदरम्यान अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे. याचा अनेक नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० चा कृती आराखडा तयार केला. परंतु या अहवालात १०५ गावातील विहिरी खोल करणे व गाळ काढणे, चार गावातील खासगी विहिरी अधिग्रहित करणे, १०३ गावात नळयोजनांची दुरूस्ती, १३९ गावातील विंधन विहिरींची दुरूस्ती करणे, ४६७ गावात विंधन विहिर घेणे, ५९ गावात कूपनलिका करण्याचे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही.१६३ स्त्रोतांसाठी सूचविल्या उपाययोजनासंभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना केली आहे. भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी यावर्षीच्या उपाययोजनेमध्ये ६१७ गावे प्रस्तावित आहेत. विहिर खोल व विहिरीतील गाळ काढण्यासाठी ७० लाख नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ३८ लाख प्रस्तावित आहेत.जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त आहे. प्रशासनातर्फे उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. सर्वेक्षणानंतर जी कमी खर्चाच्या कामांवर उपाययोजना करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान ३३७, तर एप्रिल ते जून महिन्यामध्ये २८० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे.-विशाल मंत्री, भूवैज्ञानिक,जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीकपात