शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शिक्षकांना लागले स्व: जिल्ह्याचे वेध ;  शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 5:47 PM

बुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे.

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे.काही महिन्यापूर्वी झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे अनेक शिक्षकांना मूळच्या शाळेवरून विस्थापित  व्हावे लागले. त्यामुळे बदली प्रक्रियेतील दोष दुरूस्त करून नव्याने बदल्या करण्यात याव्यात, अश्या मागण्या शिक्षक संघटनाकडून करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टप्प्याची बदली प्रक्रिया  पार पडल्यानंतर त्या टप्प्यात बदली झालेल्या  शिक्षकांच्या  याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. जिल्ह्यात बदलीचे आदेश देऊन शिक्षक बदली शाळेवर  हजर झाले. तरीही बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी व विस्थापित शिक्षकांची  यादी प्रसिद्ध केलेली नाही, अशा अनेक समस्या मागील जिल्हांतर्गत  बदली प्रक्रियेमध्ये समोर आल्या होत्या. दिवाळीच्या या सुट्टींमध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जे शिक्षक बाहेर जिल्ह्यात आहेत, त्यांना स्व: जिल्ह्यात येण्याची संधी या बदली प्रक्रियेमुळे निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीची ही प्रक्रिया आॅनलाइन असून सुरूवातीला अर्ज करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षक यामध्ये अर्ज करू शकले नाहीत. त्यानंतर अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. मुदत संपण्यासाठी एकच दिवस उरल्याने शिक्षकांची धावपळ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात असून त्यांना स्व: जिल्ह्यात येण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 

जिल्हांतर्गत बदलीची प्रतीक्षाआंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून काही शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची प्रतीक्षाल लागली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत असून ५ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शिक्षकांचेही या बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. 

...बॉक्स...महिला शिक्षकांना अडचणीमागील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांना अवघड क्षेत्रात टाकण्यात आले. त्यात काही महिला शिक्षकांचाही समावेश आहे. महिलांचा विचार न करता त्यांना अत्यंत दुर्गम भागात किंवा ज्या ठिकाणी कुठलेच वाहन जात नाही, अशा शाळेवर महिला शिक्षकांची बदली झालेली आहे. त्यामुळे महिला शिक्षकांना अडचणी येत आहेत. 

जिल्ह्यात शिक्षकांच्या जेवढ्या रिक्त जागा आहेत, तेवढ्याच ठिकाणी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत असून सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे. - एस. टी. वराडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक