शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा बांधकाम थांबविण्याचे निर्देश

By admin | Updated: February 17, 2015 01:07 IST

भंडारा : साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे.

कार्यकारी अभियंत्याचे पत्र: दोषींवर कारवाईचे संकेतभंडारा : साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. हे बांधकाम चुकीच्या ठिकाणी करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात प्रकाशित केले. याबाबत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांनी सदर बांधकाम थांबविण्याचे पत्र उप विभागीय अभियंत्याला दिले आहे.लाखनी तालुक्यातील कटंगधरा येथील काही शेतकऱ्यांची शेती सकोली तालुक्यातील शिवणीबांध साखरा शिवरात आहे. येथून जवळूनच शिवणीबांध नाला वाहतो. यामुळे शेती बुडीत राहते. याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला आहे. अशी स्थिती असताना या नाल्यावर बंधारा मंजूर करून त्याचे बांधकाम सुरू केले. याची तक्रार काही शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली व लोकमतजवळ कौफियत मांडली. याबाबत लोकमतने १५ फेबु्रवारीच्या अंकात 'बंधारा बाधू द्या, मग फोडा!अधिकाऱ्याचे सुतोवाच' या शिर्षकाचे वृत्त प्रकाशित केले.याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एच. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बंधारा बांधकामाला विरोध असल्याच्या तक्रारीचे निवेदन काही शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी उदय बोरकर यांनी कार्यालयाला दिले. यावरून उप विभागीय अभियंता पी. आर. धुर्वे यांना तात्काळ बांधकाम बंद करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)निर्माणाधीन बंधारा परिसरातील शेती बुडीत क्षेत्रात येत असल्यास ग्रामपंचायतीने चुकीचा निर्णय व ठराव कसा घेतला याची चौकशी होणे गरजेचे आहे. यात जे दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई होईल. स्वार्थासाठी कोणी चुकीची तक्रार दिली असेल तर शासनाची दिशाभूल व कर्मचाऱ्याची बदनामी करण्यासाठी तक्रार दिल्यासंबंधात अशा तक्रारदारावर फौजदारी कारवाईची मागणी करणार आहे. बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ.- आर. एच. गुप्ता, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद भंडारा.शेतकऱ्यांसाठी हरितक्रांती करण्यासाठी साठवण बंधारा मंजूर करण्यात आला. बांधकाम ग्रामपंचायत करीत आहे. पाणी साठवण झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. शेती बुडीत होऊ नये म्हणून नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही. - रामकृष्ण चांदेवार, सरपंच, शिवणीबांध.