शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत सीसीटीव्ही लावा, अन्यथा शाळेची मान्यता घालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:21 IST

Bhandara : शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : शाळेत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी एका महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अन्यथा शाळेची मान्यता व अनुदान रोखण्यात येईल. अशी कठोर कारवाई करण्यात येईल, अशा संदर्भातील पत्र शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संयुक्तपणे काढले आहे.

बदलापूर घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षितताविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी, यासाठी जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. शाळा परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णय जारी झाल्यापासून एक महिन्याच्या आत शाळेत प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आहे.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तर लावाच, शिवाय त्यातील फुटेज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासावे. आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास पोलिस विभागासोबत संपर्क साधायचे आहे

पुढील कारवाई मुख्याध्यापकांना करायची आहे. सीसीटीव्ही लावण्याचे कार्य एका महिन्याच्या आत करण्यात आले नाही तर शाळेची मान्यता काढणे तसेच अनुदान रोखण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेबाबत लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार घडताना आढळून येतात समाजाचा या घटनेकडे बघण्याच्या दृष्टिकोन संवेदनशील असतो. त्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन एका आठवड्यात करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे.

नियुक्त्ती वेळी घ्या काळजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्त्ती करताना नियुक्त्त कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यात यावी. पोलिस विभागाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवावा, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करताना सहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. 

तक्रारपेटी आवश्यक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत तक्रारपेटी बसवण्यात यावी. तक्रारपेटीबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. परिपत्रकानुसार तक्रारपेटीच्या संदर्भात पालन न केल्यास मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाbhandara-acभंडारा