शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाला तुडतुड्याची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

वातावरणातील बदलाने उन्हाळी धानाचा हंगाम संकटात सापडलेला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने धान उत्पादकांचा पाठलाग केल्याने उन्हाळी हंगाम रोगराईच्या सावटातच आटोपावा लागत आहे. गत वर्षीपर्यंत सहसा उन्हाळी धानात रोगांचे प्रमाण अत्यल्प असायचे. मात्र या वर्षाला नियमित ढगाळ वातावरण, गरम व थंड हवामान असल्याने धान पिकावर विविध रोगाचे आक्रमण झालेले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : कृषी विभागाने सुचविल्या उपायोजना

मुखरू बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : उन्हाळी धानाचा हंगाम अंतीम टप्प्यात असताना हाताशी आलेल्या धानाला तुडतुड्याची लागण झाली आहे. त्यामुळे रसशोषक किडी धानावर तुटून पडल्याने धान पिकांचे नुकसान होत आहे. परीणामी शेतकरी घाबरला असून अपरिपक्व धान कापणीसाठी सरसावलेला आहे.वातावरणातील बदलाने उन्हाळी धानाचा हंगाम संकटात सापडलेला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने धान उत्पादकांचा पाठलाग केल्याने उन्हाळी हंगाम रोगराईच्या सावटातच आटोपावा लागत आहे. गत वर्षीपर्यंत सहसा उन्हाळी धानात रोगांचे प्रमाण अत्यल्प असायचे. मात्र या वर्षाला नियमित ढगाळ वातावरण, गरम व थंड हवामान असल्याने धान पिकावर विविध रोगाचे आक्रमण झालेले आहे. खोडकिडी, मानमोडी, करपा व आता तुडतुडा लागल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न निश्चितच कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.मंडळ कृषी अधिकारी पालांदूर यांच्या पुढाकारात शेतकऱ्यांना कीड व रोग नियंत्रणासाठी नियमित मार्गदर्शन सुरू आहे. मात्र यामुळे धान उत्पादकांचा खर्च वाढून उत्पन्न नक्कीच प्रभावित झालेले आहे. कापणी, बांधणी व मळणी चा हंगाम तेजीत असताना तुडतुड्याच्या आक्रमणाने फवारणी करणे अनिवार्य झालेले आहे. मजूर टंचाईचा सामना करीत सकाळी व सायंकाळी उन्हाच्या भीतीने फवारणी शेतकºयांनी सुरू केलेली आहे. फवारणीसाठी पूर्व व मोसमी पावसाने बाधा आणल्याने फवारणी सुद्धा करणे जिकरीचे झालेले आहे. मात्र नजरेच्या समोर तुडतुड्याने होत असलेले नुकसान पहावत नसल्याने शेतकरी फवारणी करिता महागडी औषध फवारणी करीत आहे.धान खरेदी केंद्र हा शेतकºयांना मोठा आधार असल्याने धान खरेदी केंद्राकडे मोठ्या आस्थेने शेतकरी बघत आहे, मात्र अजूनही धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी धान विकण्याच्या विवंचनेत पडला आहे. खाजगीत पडत्या भावाने धान्य विकून प्रति क्विंटल सुमारे तीनशे रुपयाचा नुकसान शेतकरी सहन करीत आहे. निदान ज्या धान खरेदी केंद्राकडे गोदामाची व्यवस्था आहे त्यांनी तरी शेतकºयांच्या हितार्थ उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता पुढे येत शेतकºयांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.शक्यतो धान कापणीचा कालावधी लक्षात घेता फवारणी टाळण्याचा प्रयत्न करावा. आठवडाभराच्या अंतरात कापणी शक्य असल्यास फवारणी करू नका. पंधरा-वीस दिवसाचा कालावधी धान कापणी असल्यास तुडतुडा नियंत्रक फवारणी करू शकता.-पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी, लाखनी

टॅग्स :agricultureशेती