इंडिका झाडावर आदळली
By Admin | Updated: February 9, 2016 00:38 IST2016-02-09T00:38:30+5:302016-02-09T00:38:30+5:30
देवी दर्शनाला जात असतांना भाविकांच्या इंडिका वाहन झाडावर आढळली.

इंडिका झाडावर आदळली
एक ठार, चार जखमी : वाही जलाशयानजीकची घटना
पवनी : देवी दर्शनाला जात असतांना भाविकांच्या इंडिका वाहन झाडावर आढळली. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. चार जण जखमी असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना आज, पहाटे ४ वाजता दरम्यान पवनीजवळील वाही जलाशयाजवळ घडली.
वणी येथील युवक डोंगरगड देवी दर्शनाला एमएच१३ एसी०९८३ या इंडिकाने जातानी वाही जलाशयाजवळील झाडाला धडक दिली. यात जगदीश पारसमल मेहता (३२) रा. प्रगतीनगर वणी यांचा जागीच मृत्यू झाला. चालक अविनाश माधवराव घाटोळे (२६), ओमप्रकाश दिलीप मुळे, राजेश बाबुराव ढवस, शशीकांत भाऊराव पाचभाई (३३) सर्व रा. वणी येथील रहिवासी आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पवनी पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)