शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

११ वर्षात हमीभावात १०१८ रूपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:00 AM

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. संपूर्ण राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. साधारणत: एक लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. संपूर्ण अर्थव्यवस्था धानाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र अलिकडे उत्पादन खर्च हाती येणारी किमत यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरत नाही.

ठळक मुद्देधान उत्पादकांची कोंडी : उत्पादन खर्चात तिप्पट वाढ, शासनाकडून मात्र बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मशागतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमतीत भरमसाठ झालेली वाढ यामुळे धान पिकाचा उत्पादन खर्च तिप्पट वाढला असून गत ११ वर्षात केवळ १०१८ रुपयांची वाढ झाली आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. शासन बोनसच्या नावाखाली शेतकऱ्यांची बोळवण करीत असून धानाला हमीभाव २५०० देण्याची गरज आहे.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. संपूर्ण राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. साधारणत: एक लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. संपूर्ण अर्थव्यवस्था धानाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र अलिकडे उत्पादन खर्च हाती येणारी किमत यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरत नाही.गत ११ वर्षात धानाच्या हमीभावात १०१८ रुपयांची वाढ झाली आहे. २००८-०९ मध्ये अ ग्रेडच्या धानाला ८८० रुपये तर साधारण धानाला ८५० रूपये दर होता. आता २०२०-२१ मध्ये अ ग्रेडच्या धानाला १८६८ रूपये तर सर्वसाधारण धानाला १८८८ रूपये दर देण्यात आला. त्यामुळे केलेला लागवड खर्चही निघने कठीण झाला आहे. एकरी १८ ते २० हजार रूपये खर्च येत असून त्यातुलनेत उत्पन्न मात्र कमी येत आहे. कृषी मूल्य आयोगाने ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.धानाला हवा २५०० रुपये हमीभावधानाच्या हमीभावात वाढ करण्याची मागणी शेतकरी दरवर्षी करीत आहे. मात्र बोनसच्या नावाखाली शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. गत अनेक काळापासून असलेली ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खाजगी व्यापाऱ्यांना विकूण आर्थिक शोषणाला बळी पडत आहेत. शेती तोट्याची होत असून आता जगायचे कसे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड