शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात चोरीच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

साकोली तालुक्यातील उमरी शेतशिवारात एक इलेक्ट्रीक एचपी मोटार अंदाजे चार हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. गत काही दिवसांपासून चोरीचा तपास लागत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये भरुन ठेवलेल्या धान पोत्यांची चोरी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : पोलिसांचे दुर्लक्ष, लावेश्वर येथे भरदिवसा पशुधनाची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतशिवारात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शेतातील पशुधनासह विविध वस्तू चोरट्यांकडून लंपास केल्या जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.शेतात रब्बी हंगामासाठी अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक मोटारपंप, पाईप, केबल यासारख्या सिंचनाची साधने उघड्यावरच ठेवलेली असतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत शेतशिवारांना लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण पसरले आहे.पवनी तालुक्यात शेतात चुरणा करून ठेवलेल्या धानपोत्यांची चोरी झाल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान मोहाडी तालुक्यातील लावेश्वर येथे दोन शेळ्या व एक बोकड असा एकूण एकोणीस हजारांचा मुदुदेमाल चोरट्यांनी चोरला.साकोली तालुक्यातील उमरी शेतशिवारात एक इलेक्ट्रीक एचपी मोटार अंदाजे चार हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. गत काही दिवसांपासून चोरीचा तपास लागत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये भरुन ठेवलेल्या धान पोत्यांची चोरी झाल्याची घटना घडली. लाखांदूर तालुक्यातील साखरा येथील रमेश शेंडे व दिघोरी मोठी येथील शेतकरी मिलिंद करंजेकर या अल्पभुधारक शेतकऱ्यांचे दहा धानपोते चोरीला गेले. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पंचनामा केला मात्र अद्यापही त्याचा तपास लागलेला नाही. कित्येक दिवसांपासून पोलीसांना सुगावे लागत नसल्याने चोरट्यांकडून शेतशिवाराला लक्ष केले जात आहे.चोरट्यांचे पशूधनावर लक्षजिल्ह्यात शेतातील चोºयांच्या सत्रांत वाढ झाली आहे. शेतकºयांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांची चोरी होत असल्याने जिल्ह्यातील पशुधनपालकांनीही धास्ती घेतली आहे. मोहाडी, साकोली, लाखनी तालुक्यात सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची मागणी लावेश्वर येथील दिलीप काळे, उमरी येथील राजेश कापगते यांनी केली आहे.

टॅग्स :Thiefचोर