शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

मंडईत राजकारणाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:34 PM

शेकडो वर्षापूर्वीपासून सुरू असलेला मंडईचा उत्सव आजतागायत अनेक गावांमध्ये दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. मात्र जुन्या काळात यानिमित्त जो सलोखा व शांती निर्माण करण्याचा उद्देश होता तो कुठेतरी आज लोप पावत आहे.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन ते मनोरंजन : ग्रामीण भागात बदलतोय मंडईचा 'ट्रॅक'

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेकडो वर्षापूर्वीपासून सुरू असलेला मंडईचा उत्सव आजतागायत अनेक गावांमध्ये दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. मात्र जुन्या काळात यानिमित्त जो सलोखा व शांती निर्माण करण्याचा उद्देश होता तो कुठेतरी आज लोप पावत आहे. मंडईनिमित्त नवी सोयरीक जोडण्याची संधीसुद्धा निर्माण केली जात होती. काही प्रमाणात जुन्या प्रथा परंपरा अजूनही सुरू आहेत. परंतु बदलत्या काळानुसार व बदललेल्या मानसिकतेमुळे अनेक गावांमध्ये मंडई उत्सव साजरा करणे बंद झाले आहे.काही गावांमध्ये मंडई भरविण्यावरुन राजकारण पेटून उठत असते. त्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडते. परंतु काही गावाम्ांध्ये राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून परंपरा कायम ठेवण्याची धडपड सुरू आहे.काही जुन्या लोकांशी मंडईबद्दल संवाद साधला असता त्यांनी आपले अनुभव दिलखुलासपणे मांडले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्षभर आपल्या शेतीच्या नियोजनात व कामात गुंतून राहायचे. त्यांच्या इच्छा-अपेक्षा त्याकाळी मर्यादित असायच्या. त्यामुळे एकमेकांशी प्रेमाने संवाद साधण्यासाठी तसेच सहकार्य करण्यासाठी एकमेकांना भरपूर मदत करायचे आणि नि:स्वार्थ भावनेतून वेळ काढून धावून यायचे. अनावधानाचे किंवा चुकीने काहींच्या मनात एकमेकांबद्दल वैमनस्य निर्माण झाले तर मंडईच्या दिवशी एकत्र येवून एकमेकांना पान खाण्यासाठी देवून जुने वैमनस्य संपविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात होता.दरवर्षी दिवाळीनंतर गावात मंडईचे आयोजन केले जाते. याचे नियोजन अनेक गावकरी दिवाळीपूर्वीच करायला सुरुवात करीत होते. दिवाळी साजरी होताच गोपालक गोधन पूजेनंतर प्रत्येक घरी नाचायला जायचे व घरमालकाला प्रेमाने अलिंगन द्यायचे. त्याच्याच एक मोठा उत्सव मंडईच्या स्वरुपात निर्माण करायचा.मंडईची तिथी ठरविल्यानंतर त्या दिवशी दिवसभर मंडई उत्सव असायचा. प्रत्येक घरी पाहुणे म्हणून यायचे. दिवसभर कोणतेही काम न करता आलेल्या पाहुण्यांचे स्वागत तसेच गावातील लोकांच्या भेटीगाठी व अलिंगन देण्याचा क्रम चालायचा. गावातील गोपालक प्रत्येक घरी गाजत वाजत जावून मंडई असलेल्या ठिकाणी येण्याचे आवाहन करायचे. त्यानंतर गावातील प्रमुखाच्या घरुन मंडईची आरती व दिंडी काढली जात असे. ती दिंडी गावात भ्रमण करीत मंडईच्या मैदानावर न्यायची.दरम्यान वाटेत जेवढे देवी देवताचे देवस्थान मिळत त्यांना नमस्कार व पूजन कार्यक्रम, मंडई स्थळावर दिंडी व झेंडे बांधलेले बांबू जमिनीत गाडले जायचे. त्या ठिकाणी देवाची, मंडई देवीची श्रद्धापूर्वक पूजा होत असे. गावातील मान्यवर मंडळींसह महिला-पुरुष तिथे बसायचे. तिथे गावकरी आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करायचे.विविध प्रदर्शन संपल्यानंतर सर्वांना पान खाण्यासाठी देवून त्यांची गळाभेट व्हायची. जुने वैमनस्य विसरणे, हात मिळवणे व इतर क्रम चालायचे. त्यानंतर मंडईनिमित्त लागलेल्या वेगवेगळ्या दुकानातून आवडत्या वस्तंूसह सौंदर्यप्रसाधनांची भरपूर खरेदी करणे हा क्रम सायंकाळपर्यंत चालायचा. गावातील महिला आधी कोणतीही खरेदी करायला बाहेर जात नव्हत्या, परंतु गावात मंडई भरली की त्या मंडई उत्सवाचा भरपूर आनंद घेत सौंदर्य प्रसाधन व आवडते खाऊ व खाद्यपदार्थ खरेदी केले जात होते. सायंकाळ होताच आलेल्या पाहुण्यांचा गोडधोड पदार्थ बनवून पाहुणचार करायचा.एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा होऊन आणि रात्रीला दंडार, नाटक, छत्तीसगडी नाच यापैकी कोणत्याही एका कार्यक्रमाचे आयोजन होत असे. हे कार्यक्रम प्रत्यक्ष समाजप्रबोधन करणारे असून त्यातील कथा, प्रसंग लोकांच्या मनावर उमटून राहात होते.लाखांदूर तालुक्याला मध्यप्रदेशाच्या प्रथा परंपरांचा प्रभाव तर पूर्वेकडील भागात छत्तीसगडी प्रथा परंपरांचा ठसा उमटलेला दिसून येतो. त्यामुळे मंडईनिमित्त रात्रीचे आयोजन त्या गावातील लोकांच्या आवडीनुसार केले जाते.मध्यप्रदेश व छत्तीसगड सिमेलगतच्या गावामध्ये जास्त करून छत्तीसगडी नाच, धमाका आयोजित केला जातो. मधल्या परिसरात अनेक गावामध्ये डॉन्स हंगामाची क्रेज जास्त आहे. तर इतर मराठी भाषिक क्षेत्रात मराठी नाटकांना जास्त पसंती असते.काही लोक आता आपले नफा-नुकसान बघून मंडईला महत्व देतात. वरून हेकेखोर राजकारण मधात शिरल्याने वाद-विवाद घडणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे सध्या समाज मंडईपासून दूर राहण्याचा विचार करीत असतो. काही गावात तर दिवसाची मंडई न ठेवता रात्रीला नाटक किंवा ड्रामा आयोजित करुन गावातील लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता प्रबोधन कमी आणि मनोरंजनाकडेच जास्त कल दिसून येत आहे.शेकडो वर्षापासून लाखांदूर तालुक्यासह इतर गावांमध्ये नाटक आणि छत्तीसगडी धमाका चालत राहीला. यापैकी अनेक गावे आता मंडईकडे पाठ फिरवू लागले आहेत. दिघोरी मोठी, चप्राड, झरी, पिंपळगाव, सोनी, बारव्हा परिसरात मंडईपेक्षा नाटकाच्या प्रयोगावर जास्त भर देतात. काही प्रमाणात जुन्या प्रथा परंपरा अजूनही सुरू आहेत. परंतु बदलत्या काळानुसार व बदललेल्या मानसिकतेमुळे अनेक गावांमध्ये मंडई उत्सव साजरा करणे बंद झाले आहे. काही गावाम्ांध्ये राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून परंपरा कायम ठेवण्याची धडपड सुरू आहे.समाज प्रबोधन लोप पावून केवळ मनोरंजन शिल्लकदिवाळीच्या तिसऱ्या दिवसापासून गावोगावी भरणारी मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एक उत्सवच. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या मंडईचे आकर्षण प्रत्येकाला असायचे. या मंडईत विविध वस्तूंच्या खरेदीचे आकर्षण, आप्तेष्टांच्या भेटींची असणारी ओढ, पाहुण्यांना होणारा पाहुणचार आणि रात्री मनोरंजनासह विविध नाटक, ड्रामा, दंडार, पोवाड्याच्या माध्यमातून होणारे समाजप्रबोधन असायचे. पण आज यातील बºयाच गोष्टी मंडईतून हद्दपार होत आहेत. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचे आकर्षण कमी झाले असले तरी समाजप्रबोधन लोप पावून केवळ मनोरंजन शिल्लक राहिल्याने ही बाब खटकणारी ठरत आहे. त्यातही काही ठिकाणी ‘छत्तीसगडी धमाका’च्या नावावर रात्री चालणारे अश्लिल नृत्य मंडईतील पावित्र्यच धोक्यात आणत आहे.