पोहरा येथे जिल्हास्तरीय पोलिओ मोहिमेचे उद्घाटन
By Admin | Updated: January 18, 2016 00:26 IST2016-01-18T00:26:29+5:302016-01-18T00:26:29+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमअंतर्गत भंडारा जिल्ह्याचे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले.

पोहरा येथे जिल्हास्तरीय पोलिओ मोहिमेचे उद्घाटन
लाखनी : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमअंतर्गत भंडारा जिल्ह्याचे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले.
मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती विनायक बुरडे, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रत्नघोष झलके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, पंचायत समिती सदस्य संजय डोळस, ग्रामपंचायत सदस्य जीजा तुमडाम उपस्थित होते.
याप्रसंगी लहान बाळाला पोलिओ डोज पाजून भाग्यश्री गिलोरकर व विनायक बुरडे यांनी जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन केले. याप्रसंगी पोलिओ माहिमेचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डोईफोडे यांनी केले. संचालन कुष्ठरोग तंत्रज्ञ एन. आर. पाखमोडे, आभार डॉ. मोटघरे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ. ए. ए. धात्रक, डॉ. एन. ए. पातुरकर, एन. एन. पाखमोडे, पोहरा आरोग्य केंद्रातील कर्मचारी डोबणे, पराते, मेश्राम, फुलसुंगे, फुलझेले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)