कोंढा-कोसरा : वार्ताहर काशीराम हुमने महाविद्यालय कोंढा कोसरा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन संस्था सहसचिव डॉ.नितीन हुमणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून स्पंदन नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य इरप्पा कुरबेट, प्राचार्य चंद्रहास हुकरे, प्रा.अमोल मंगर, तसेच काशीराम हुमणे, प्राध्यापक चेतन माकडे, युगल जिभकाटे, लक्ष्मी राखडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना डॉ.नितीन हुमने यांनी जीवनात जिद्द बाळगा, तसेच मेहनत करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, तर निश्चित यश मिळते. यासाठी विद्यार्थी ध्येयनिष्ठ असणे गरजेचे आहे. आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी केंद्र उघडणार असल्याचे सांगितले. संचालन चेतन माकडे, तर आभार लक्ष्मी राकडे हिने व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST