शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 20:13 IST

Sakoli Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate Nana Patole Congress : भाजप व काँग्रेसमध्ये झाली चुरशीची लढत

साकोली : नुकत्याच पार पडलेल्या साकोली विधानसभेच्या मतमोजणीत अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या २०८ मतांनी निसटता विजय झाला विजयानंतर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत विजय रॅली काढण्यात आली      

आज सकाळी आठ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात साकोली मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली. यात काँग्रेस व भाजप यांच्या चुरशीची लढत झाली. अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अवघ्या २०८ मतांनी निसटता विजय झाला. यावेळी साकोली मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉक्टर सोबत करंजकर यांना मते मिळाली. या मतमोजणीसाठी सकाळपासून तहसील कार्यालय परिसरात पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसील कार्यालयासमोर निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती. सायंकाळी सहा वाजे दरम्यान निकाल घोषित करण्यात आला. यात नाना पटोले विजय झाल्याची घोषणा करण्यात आली. घोषणा आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली या रॅलीमध्ये खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे समाज कल्याण सभापती मदन रामटेके काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अश्विन नशिने, इंजिनियर संदीप बावनकुळे, विजय दुबे, नईम अली यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मात्र आमदार नाना पटोले उपस्थित नव्हते 

फेर मतमोजणीची मागणी फेटाळली

विजयाची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी माजे यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Nana Patoleनाना पटोलेsakoli-acसाकोलीcongressकाँग्रेसbhandara-acभंडाराBJPभाजपा