शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीसाठी मध्यप्रदेशातील महिला मजुरांची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

सिहोरा परिसरात यांत्रिक पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात येत नाही. महिलांच्या माध्यमातून रोवणीची कामे केली जात आहेत. पावसाने हजेरी लावताच धान पिकांच्या रोवणीला परिसरात वेग आलेला आहे. यामुळे गावांत शेतकऱ्यांना महिला मजुरांचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. नजीकच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावात महिला मजुरांचा शोध घेतला जात आहे. मध्यप्रदेशातील गावातही धान पिकांच्या रोवणीला सुरुवात झाली आहे; परंतु धानाचे नर्सरी उशिरा घातल्याने रोवणीच्या कार्यास गती आली नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धान पिकांच्या रोवणीला वेग आलेला आहे. सिहोरा परिसरात महिला मजुरांचा तुटवडा असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. यातच मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावातून महिला मजुरांची आयात करण्यात येत आहे. मजुरीचे दर वाढले असून वाहनांचा खर्चही महागला आहे. मजुरांचे आयात करण्यात स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.सिहोरा परिसरात यांत्रिक पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात येत नाही. महिलांच्या माध्यमातून रोवणीची कामे केली जात आहेत. पावसाने हजेरी लावताच धान पिकांच्या रोवणीला परिसरात वेग आलेला आहे. यामुळे गावांत शेतकऱ्यांना महिला मजुरांचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. नजीकच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावात महिला मजुरांचा शोध घेतला जात आहे. मध्यप्रदेशातील गावातही धान पिकांच्या रोवणीला सुरुवात झाली आहे; परंतु धानाचे नर्सरी उशिरा घातल्याने रोवणीच्या कार्यास गती आली नाही. या गावात असणाऱ्या महिला मजुरांची आयात करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या मजुरांना ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात येत आहे. डिझेल महागल्याने चारचाकी वाहनांचा खर्चही महागला आहे. शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणी लवकर आटोपण्यासाठी महिला मजुरांकरिता घरपोच सेवा सुरू केली आहे. दरवर्षी येणाऱ्या महिला मजुरांना शेतकऱ्यांनी अतिरिक्त मजुरी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुष मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय खरीप हंगामातील रोवणीच्या कामात उपयोगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या प्रतितासात ३०० रुपयांनी वाढ ओलांडली आहे. प्रति तास एक हजार रुपयाने दर गाठले आहेत. परिणामी शेतकऱ्यांवरील संकट संपत नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे.

धानाचे दर पडले, खत महागले- खुल्या बाजारात धानाचे दर पडले आहेत. १३५० रुपये प्रतिक्विंटल धानाची विक्री शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. खतांची ५० किलोची बॅग १५०० रुपयाने महागली आहे. सरासरी प्रतिएकर २० हजार रुपये येत असताना महागाईने ३० हजार रुपयांचा खर्च ओलांडणार आहे. यात खत, बी बियाणे, औषध फवारणी, मजूर, व अतिरिक्त खर्च असले तरी शेती परवडणारी नाही. अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहेत.

भावांनो ! जरा सांभाळून- खरीप हंगामातील शेतीचे कामे जोरात सुरू आहेत. ट्रॅक्टरने शेतीचे कामे केली जात आहेत. ट्रॅक्टरच्या चाकांना मातीचे पेंडके राहत आहेत. मार्गावर थेट ट्रॅक्टर धावत असल्याने मातीचे पेंडके पडल्याचे दिसून येत आहेत. हे मातीचे पेंडके मोटरसायकलच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. रात्री मोटारसायकलने प्रवास करताना पेंडक्यामुळे धोकादायक ठरत आहेत. पाऊस येताच ह्या मातीच्या पेंडक्यावरून वाहनांचे अपघात होत आहे. शेतातून बाहेर पडताच चाकांना मातीचे पेंडके स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.  

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती