कर्णकर्कश आवाजाच्या निर्णयाची अंमलबजावणी शून्य

By Admin | Updated: March 14, 2015 00:48 IST2015-03-14T00:48:19+5:302015-03-14T00:48:19+5:30

वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

The implementation of the sound voice is zero | कर्णकर्कश आवाजाच्या निर्णयाची अंमलबजावणी शून्य

कर्णकर्कश आवाजाच्या निर्णयाची अंमलबजावणी शून्य

भंडारा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली आहे; परंतु या निणर्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
भंडारा शहरात प्रेशर हॉर्नची सर्रास विक्री केली जात आहे. मुलींची छेड काढण्यासाठी तसेच पादचारी, वाहनचालकांना घाबरविण्यासाठी टारगट मुलांकडून या हॉर्नचा वापर केला जात आहे. वाहतूक पोलिसांच्या उदासीनतेमुळे प्रेशर हॉर्न वापरणाऱ्यांचे फावत असल्याचे चित्र आहे. लोकांना कर्णबधिर करण्याची क्षमता असणाऱ्या प्रेशर हॉर्नची शहरातील आॅटोमोबाईल्स दुकानातून सर्रासपणे विक्री केली जात आहे. या आवाजामुळे समोरचा व्यक्ती दचकतो.
बहुतांश आॅटोरिक्शांवर प्रेशर हॉर्न बसविण्यात आले आहेत. शेकडो मोटारसायकल व कारची शोभा वाढविण्याचे काम प्रेशरहॉर्न करीत आहेत. जादा नफा कमावण्यासाठी शहरातील काही दुकानदार प्रेशर हॉर्नची विक्री करीत आहेत.
‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्राहक म्हणून काही दुकानांना भेटी दिल्या असता दुकानदारांनी प्रेशर हॉर्न सहजरीत्या उपलब्ध करून दिले. प्रेशर हॉर्न विकण्यासाठी बंदी असल्याचे दुकानदारांच्या निदशर्नास आणून दिले असता, आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून आम्हाला तशा सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत, असे उत्तर एका दुकानदाराने दिले.
प्रेशर हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली जाते हे आम्हाला माहिती आहे; परंतु त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते की नाही याची माहिती नसल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. शहरात बेमालुमपणे भरधाव वाहने धावत असून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The implementation of the sound voice is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.