संचारबंदीत चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:49+5:30
तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नरव्हा व मºहेगाव येथून लॉकडाऊनच्या काळात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.

संचारबंदीत चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मºहेगाव, नरव्हा या चुलबंद नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून लॉकडाऊनच्या काळात प्रशासन व्यस्त असल्याचे फायदा घेत अवैख वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनासमोर होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नरव्हा व मºहेगाव येथून लॉकडाऊनच्या काळात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.
रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करून दामदुप्पट भावात विकत असतात. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभर खासगी, शासकीय कार्यालये बंदचा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायालयाचे कामकाज मर्यादीत वेळेत आटोपले जातात. गर्दी टाळण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडू दिल्या जात नाही. हीच संधी रेतीमाफियांनी हेरली आहे. सर्व प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध रेतीचे परिवहन सुरु आहे. अनेक शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. तालुक्यातील मिरेगाव, भूगाव, पळसगाव, नरव्हा, पाथरी, मºहेगाव, वाकल येथून अवैधपणे रेतीचीउचल केली जात आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे.
ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक
चुलबंद नदीतून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने लाखनी, पालांदूर (चौ.), मुरमाडी (तुपकर) व परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात असते. ही अवैध वाहने पोलीस स्टेशनसमोरून जात असतात. चुलबंदचे नदीघाट रेतीमाफियांसाठी तस्करीचे कुरण बनले आहे. परिसरात रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत आहेत. मºहेगाव घाटावर रात्रभर विनाक्रमांकाच्या ट्रॉलीसह, ट्रॅक्टरची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.