शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतात राबलो नाही तर रात्री चूल कशी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. आप्त स्वकियांच्या मृत्यूच्या वार्ताही धडकत आहे. संचारबंदीने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या संकटातही शेतात राबताना दिसत आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. रखरखत्या उन्हात मजूर धानाची कापणी करीत आहे. 

ठळक मुद्देशेतमजुरांची व्यथा : कोरोना संकटातही राबतात शेतशिवारात

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : संकट अस्मानी असो की सुलतानी. पोटासाठी घराबाहेर पडावेच लागते, शेतात राबावेच लागते. हातावर पोट असले, मजूर कोरोनाच्या सावटातही शेतशिवारात राबत आहेत. कोरोनाने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरून चालेल तरी कसे. शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात राबणाऱ्या मजुरांनी सांगितली. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. आप्त स्वकियांच्या मृत्यूच्या वार्ताही धडकत आहे. संचारबंदीने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या संकटातही शेतात राबताना दिसत आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. रखरखत्या उन्हात मजूर धानाची कापणी करीत आहे. कोरोना नियमांचे पालन आणि ताेंडाला मास्क लावून मजूर शेतात राबत आहेत. घरी असलेल्या चिल्यापिल्यांची चिंताही त्यांना सतावत आहे. आरोग्याची काळजी घेत भीतीच्या सावटात मजूर राबत आहे. गीताबाई राऊत म्हणाल्या, कोरोना असो की आणखी काही, आम्हाला राबल्याशिवाय पर्याय नाही. गरिबीपुढे कोरोनाचेही भय संपले आहे. शेतात राबलो नाही, तर आम्हाला उपाशीच राहावे लागेल. कोरोना झाला, तर सरकारी दवाखाना आहे, परंतु आम्हाला कोरोना होणारच नाही. आम्ही नियमाचे पालन करतो, असे त्या सांगत होत्या. रमेश ठवकर म्हणाले, कोरोना संकटाने आम्ही घाबरलो, तर उपाशीच राहावे लागेल. सरकारने मदतीचा हात दिला, पण त्यात कुटुंबाचा गाढा ओढायचा कसा, शेतात राबूनच दोन घास पोटात जातील. वर्षभर राबणे हेच आमच्या नशिबी असल्याचे रमेश सांगत होता. 

वीतभर पोटासाठी कोरोनाशी दोन हात  शेतीचा आधारच मजूर आहे. मजूर शेतात राबला नाही, तर शेतातील धान्य शेतकऱ्याच्या घरी पोहोचणार नाही. सध्या शेतशिवारात धान काढणीला आला आहे. कोरोनाच्या सावटात शेतकरी मजुरांकडून काम करून घेत आहे. संकट कोणतेही असो, वीतभर पोटासाठी सामना करावाच लागतो. शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहे, परंतु या योजनांचा लाभही अनेक मजुरांना मिळत नाही. शासन आणि प्रशासनाच्या योजना अशिक्षितपणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरी