विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवल्यास यश हमखास -मिश्रा
By Admin | Updated: September 13, 2014 23:41 IST2014-09-13T23:41:01+5:302014-09-13T23:41:01+5:30
स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते,

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवल्यास यश हमखास -मिश्रा
भंडारा : स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते, असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधिक्षक जे.बी. मिश्रा यांनी केले.
समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने पंजाबी हॉल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कर समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधीक्षक जे.बी. मिश्रा होते. प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विचार मंचचे संस्थापक प्रा.वामन तुरिले, दलित मित्र डॉ.एल.एम. चौधरी, प्रदीप काटेखाये, विलास केजरकर, रशिद खान, मोहम्मद शरीफ शेख, सयैद नसीम, समीर नवाज, शाहिद खान, वकिल सिद्धीकी उपस्थित होते.
त्याप्रसंगी पॅरामिड इंडिया एज्युकेशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमित दिलीप साखरेला २१ हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र तसेच ऐश्वर्या नामजोशी, विवेक केशव चटप, दुर्गेश डोबले, रोहित जोशी, दर्शन सोनवाने, अनवर शेख, योगिता निमजे, प्रतीक्षा पंचभाई, संकल्प बागडे, पराग भुरे यांचा बॅग, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता पाचखेडे यांनी केले व संचालन समीर नवाज यांनी केले. आभार विलास केजरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रणिता पाचखेडे, आवेश खान, भाग्यश्री खेडीकर, मयुर पडोळे, अश्विन नागदेवे, पल्लवी क्षीरसागर, गुलनाज शेख, पाशु खान, वशीम खान, अश्विनी बोरिकर, तोशिफ शेख आदींनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)