अज्ञात वाहनाच्या धडकेने पती ठार, पत्नी गंभीर; भंडारा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 09:53 IST2019-06-24T09:53:33+5:302019-06-24T09:53:52+5:30

जिल्ह्यातील लाखांदूर-परसोडी मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून मोटरसायकलवरून जात असलेल्या दांपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Husband killed, wife serious; accident in Bhandara District | अज्ञात वाहनाच्या धडकेने पती ठार, पत्नी गंभीर; भंडारा जिल्ह्यातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेने पती ठार, पत्नी गंभीर; भंडारा जिल्ह्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्ह्यातील लाखांदूर-परसोडी मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून मोटरसायकलवरून जात असलेल्या दांपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. लोकेश बोदाराम दिघोरे असे या मृत इसमाचे नाव असून, तो पत्नीसह सासुरवाडीला जात असताना हा अपघात घडला.
अज्ञात वाहनाने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की, त्या धडकेनंतर मोटरसायकलची टाकी फुटून तिने पेट घेतला व जळून खाक झाली.

Web Title: Husband killed, wife serious; accident in Bhandara District

टॅग्स :Accidentअपघात