सर्वसामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:30+5:30

त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त सक्षम होण्याची गरज असल्याचे सांगितले.

The Human Rights Commission, which provides justice to the general public | सर्वसामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग

सर्वसामान्यांना न्याय देणारा मानवाधिकार आयोग

googlenewsNext
ठळक मुद्देराजेश मोकडे : भंडारा येथे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात जगत असताना अनेक गोष्टींसाठी मानवाधिकार आयोगाकडून न्याय मिळत आहे. जागतिक मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने मानवी हक्कांची प्रचार व प्रसिध्दी सर्व सामान्यापर्यंत व्हावी, यासाठी प्रत्येकांनी झटले पाहिजे, असे प्रतिपादन मानवी हक्क आयोगाचे राज्याध्यक्ष राजेश मोकडे यांनी केले.
ह्युमन राईट्स कॉऊंसील शाखा भंडारातर्फे येथील शास्त्री चौकातील सलासर लॉन येथे आयोजित जागतिक मानवी हक्क दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विदर्भ सचिव प्रशांत लोही, विदर्भ महिला अध्यक्ष सीमा चरणे, जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, अ‍ॅड. नेहा शेंडे, उपाध्यक्ष संतोष गणवीर, अ‍ॅड. नितीन बोरकर, युवा अध्यक्ष मयूर भुरे, तुमसर तालुकाध्यक्ष प्रदीप नागपूरे, पवनी तालुकाध्यक्ष मिलिंद ठेंगडी आदी उपस्थित होते. यावेळी
विदर्भ सचिव प्रशांत लोही यांनी मार्गदर्शनातून मानवाचे मानवी हक्क कोणकोणते आहेत. तसेच याबाबतची तक्रार आयोगाकडे कशाप्रकारे करता येते. मानवी हक्क आयोग तक्रारीची दखल घेत तत्काळ कसा न्याय देते. याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष संतोष मडावी यांनी मानवी अधिकार कायद्यान्वये कोणकोणते अधिकार आहेत हे सांगून मानवी हक्काचे रंक्षण करण्यासाठी समाजातील भेदभाव, अत्याचार, हिंसा, दडपशाही विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. सोबतच प्रत्येकाने आपले कर्तव्य देखील पार पाडून देश विकासासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त सक्षम होण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील ह्युमन राईट्स कॉन्सीलचे सर्व पदाधिकारी, जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन चेतन बोरकर यांनी तर, आभार प्रदर्शन रोशन शेंडे यांनी केले.

Web Title: The Human Rights Commission, which provides justice to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.