लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर (भंडारा) : क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य बाब असली, तरी तुमसर तालुक्यात या वादाने हिंसक रूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. चित्रपट बघताना पती जवळ का बसला नाही, या कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने जीवघेणा वार करून त्याला जखमी केले. ही घटना नाकाडोंगरी येथे २६ जानेवारीला घडली. आशिष मिश्रा, असे जखमी पतीचे नाव आहे.
आशिष मिश्रा हे नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत तासिका शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपला परिवार व मित्रांसोबत तुमसर येथे 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. आशिष मिश्रा हे आपल्या मित्रांसोबत मागील रांगेत बसले, तर त्यांची पत्नी ही समोरच्या रांगेत बसली. चित्रपट संपल्यानंतर घरी परतल्यावर पत्नीने पतीला, 'तू माझ्याजवळ का बसला नाहीस?' यावरून दोघांमध्ये वाद झाला.
रागात उगारला चाकू
हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकू काढून आशिष यांच्यावर हल्ला केला. वार आशिष यांच्या हातावर लागला. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
"शिक्षक आशिष मिश्रा यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचा रिपोर्ट मागविण्यात आला असून, गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."- शरद शेवाळे, पोलिस निरीक्षक, गोबरवाही
Web Summary : In Tumser, a wife stabbed her husband after a dispute over him not sitting next to her during a movie. The husband, a teacher, was injured. Police are investigating.
Web Summary : तुमसर में, एक फिल्म के दौरान पति के बगल में न बैठने पर पत्नी ने विवाद के बाद चाकू से हमला कर दिया। पति, जो एक शिक्षक है, घायल हो गया। पुलिस जांच कर रही है।