भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:53+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली.

Housewives' budgets deteriorated at the rate of vegetables | भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचाही फटका : ग्राहकांच्या खिशाला कात्री, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाज्यांची आवक घटली

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्ग आणि वातावरण बदलाचा सरळसरळ फटका भाजीपाला पिकांवर बसला आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला महागला असून गृहीणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाली असताना भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने समस्येत भर पडली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली. त्यातच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतमालाच्या आयात-निर्यातीवर विपरीत परिणाम जाणवला.
सध्या बाजारात कुठल्याही भाजीपाल्याची टंचाई नसली तरी दरवाढीने जनसामान्यांचे बजेट कोसळले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याचेही दिसून येते. येथील थोक सब्जी मंडीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवकही वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. कोरोनासंसर्ग, वातावरणातील बदल व मागणीच्या कारणामुळे भाज्यांचे दर वाढले आहे.

सणासुदीचा काळ
जीवती म्हणजेच दीप पुजनापासून सणाला प्रारंभ होत असतो. विविध सणांच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याची तयारीही जोमात असते. अशावेळी भाजीपाल्यांचीही मागणी वाढत असते. सणासुदीचा काळ सुरू झालेला असून त्याला महगाईची झळ निश्चितपणे बसणार आहे, यात शंका नाही. वाढलेले दर कमी होणार काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.

या कारणांमुळे भाज्यांचे भाव वाढले
तीन महिन्यांपूर्वी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊननंतर जिल्हाबाहेरील भाजीपाला जिल्ह्यात येण्यास अडचण निर्माण झाली. कोरोना संसर्गाचा सरळ सरळ फटकाही भाजीपाला उत्पादकांनाही बसला. थोड्या काळासाठी रहदारीचा प्रश्नही बिकट बनला.
यावर्षी पावसाने सातत्यपणा दाखविला. प्रत्येकच महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला पिकांवर सक्रांत आली. काही ठिकाणी अपवाद वगळल्यास भाज्यांचा पुरवठा नियमित होता. परिणामी दोन महिन्यांपूर्वी दरवाढ दिसून आली नाही.
कोरोना संकटात भाजीपाला बाजारपेठ बंद नसली तरी नागरिकांनी हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांची मागणी केली नाही. हळूहळू त्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण बदलाचा फटका दरवाढील कारणीभूत आहे.

Web Title: Housewives' budgets deteriorated at the rate of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.