जवाहरनगर : जवाहरनगर (ठाणा) येथील रहिवासी रवींद्र प्रल्हाद शेंडे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घर भस्मसात झाले. यात एक लाख २५ हजारांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारला रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. शेंडे हे आयुध निर्माणी येथे कामाला गेले होते. दरम्यान, रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास मधल्या खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कुटुंबीय कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. शेजाऱ्यांनी दार उघडून आतमध्ये प्रवेश केेेला व आग आटोक्यात आणली. दरम्यान, कोणतीही जीवित हानी झाली नाही. तलाठी यांनी जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्य असे एकंदरीत एक लाख २५ हजारांच्या नुकसानीचा पंचनामा केला. यात टीव्ही ,कुलर, फ्रीज, धान्याची कोठी, कपडे, पंखे, शैक्षणिक साहित्य व आवश्यक दस्तावेज जळून राख झाले. घटनास्थळी सकाळी सरपंच सुषमा पवार, तलाठी वसुंधरा वासनिक, लोगेेसं सामंत, देवचंद पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात आले. घटनेची नोंंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
शॉर्टसर्किटच्या आगीत घर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST