परसोडीच्या ऐतिहासिक पोळ्याला १६१ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:57 AM2019-08-30T00:57:28+5:302019-08-30T00:57:58+5:30

संपूर्ण राज्यात बैल पोळा साजरा केला जातो. भंडारा तालुक्यातील परसोडी (जवाहरनगर) येथे भरणाऱ्या पोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १८५८ पासून दरवर्षी येथे पोळा भरविला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेला हा पोळा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी होत असतात.

Historic bunches of parody for 2 years | परसोडीच्या ऐतिहासिक पोळ्याला १६१ वर्षांची परंपरा

परसोडीच्या ऐतिहासिक पोळ्याला १६१ वर्षांची परंपरा

Next
ठळक मुद्दे१८५८ ला प्रारंभ : पिढ्यानपिढ्या जोपासला जातो सर्वधर्म समभाव, पोळ्याच्या दिवशी पंचक्रोशीतील नागरिकांची हजेरी

प्रल्हाद हुमणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : श्रमाचा सन्मान करण्याचा सण म्हणजे पोळा. वर्षभर बळीराजासाठी राबराब राबणाऱ्या बैलांच्या सन्मानाचा दिवस. संपूर्ण राज्यात बैल पोळा साजरा केला जातो. भंडारा तालुक्यातील परसोडी (जवाहरनगर) येथे भरणाऱ्या पोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १८५८ पासून दरवर्षी येथे पोळा भरविला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेला हा पोळा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी होत असतात.
परसोडी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. पुर्वी येथे वंजारी, गुप्ते, हटवार, डोरले, पडोळे, सुखदेवे, मेश्राम, राऊत, चव्हाण, मोटघरे आदी परिवार राहत होते. गजानन महाजन यांची सावरी, ठाणा नांदोरा येथे वतनदारी होती. गुप्ते पाटलांची वतनदारी परसोडी,बाचेवाडी, सिरसोली, किन्ही, एकोडी येथे होती. आजही परसोडी येथे महाजन व गुप्ते यांचा वाडा अस्तित्वात आहे. या वाड्यासंमोर बैलांचा पोळा भरविला जात होता. या पोळ्याला प्रारंभ १८५८ मध्ये झाल्याचे जुने जाणते सांगतात. तेव्हापासून आजतागायत पोळ्याची परंपरा कायम असून काळ बदलला तरी बैल पोळ्याचे महत्व मात्र कायम आहे.
पुर्वी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांद शेकले जातात. त्याला मोहबैली असे म्हटले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करुन सायंकाळी ५ वाजता गुप्ते पाटलांचा बारा व गजानन महाराज यांच्या १५ बैलजोड्या आंब्याच्या तोरणाखाली एकत्र येत असत. पारंपारिक झडत्या म्हटल्या जात असे. दिवंगत दपटू डोरले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष मारोतराव हटवार यांचे वडील व गावचे प्रथम सरपंच भीवा हटवार यांनी पोळ्याची परंपरा टिकवून ठेवली.
आजघडीला परसोडीची लोकसंख्या ४ हजाराच्या घरात आहे. १९८० पासून बैलांच्या सजावटीसाठी बक्षीस देण्यास प्रारंभ झाला त्यामुळे या पोळ्याला महत्त्व आले. सर्वत्र बैलजौड्यांची संख्या कमी झाली असतांनाही परसोडीच्या पोळ्यात दीडशे ते दोनशे बैलजोड्या सहभागी होतात. हा पोळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून नागरिक येतात. गावात तीन दिवस यात्रेचे स्वरुप असते. महिला व पुरुष महाराष्टीयन पोषाखात वावरताना दिसतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचे आमदंगल असते. यासोबतच कबड्डी, चमचा गोळी, बांधा दौड, बटाटा आदी स्पर्धा घेतल्या जातात. पंचक्रोशीतील नागरिकांची हजेरी असते.

Web Title: Historic bunches of parody for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी