शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

उच्चभ्रू नागरिकांना स्वच्छतेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:27 PM

फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल.

ठळक मुद्देअपार्टमेंट परिसरातील नागरिक त्रस्त : उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल. मात्र एकीकडे स्वच्छतेसाठी काही लोक जीवाचे रान करीत असताना सुशिक्षित म्हणविणाऱ्यांकडून अस्वच्छता पसरविली जात असेल तर अशा सुशिक्षितपणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न खोकरला येथील रजनीनगर परीसरातील नागरिकांना पडला आहे.खोकरला ग्रामपंचायतअंतर्गत रजनीनगरामध्ये असलेल्या एका अपार्टमेंटची पाच मजली इमारत आहे. या ठिकाणी राहत असलेले काही नागरिक वरील मजल्यावरूनच दररोजच कचरा व पाणी फेकतात. फेकण्यात आलेल्या कचºयावर डुक्करे व जनावरे ताव मारतात. यामुळे सदर कचरा परिसरत अस्ताव्यस्त होतो तसेच हवेद्वारे पसरतो. एवढेच नाहीतर कचऱ्याची दुर्गंधी सुटून परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांना त्रास होवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.खोकरला परिसरातील अशा अनेक अपार्टमेंटखाली स्वच्छतेचे तीनतेरा होत असल्याने अनेक अपार्टमेंटखाली मोठया प्रमाणात पसरलेला कचरा याची साक्ष देतो आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने अशा इमारतीमध्ये राहणाऱ्याना कर्तव्याची जाणिव करून देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा नसल्याने, नागरिकही स्वत:चे कर्तव्य विसरल्यागत वागत असल्याच्या प्रकार रजनीनगर व गंगानगर येथे राहत असलेल्या व त्रासाचा सामना करणाºया परिसरातील नागरिकांच्या तक्रारीतूनसमोर आला आहे.अपार्टमेंटमधील नागरिक घरात होणारा कचरा बाहेर नेऊन योग्य ठिकाणी न टाकता अनेकजण इमारतीवरून कचरा खाली फेकत असल्याने इमारत परिसर अस्वच्छ होतो. इमारत परिसरात पडून असलेल्या प्लास्टीक पिशव्या आणि इतर निरूपयोगी कचºयामुळे खाली राहणाऱ्या व आजुबाजूला परिसरात राहणाऱ्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री स्वच्छ भारताचे स्वप्न पाहत आहेत. तर दुसरीकडे कर्तव्याची जाणीव न बाळगता टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे नागरिक कचरा फेकून अस्वच्छता परिसरविण्याचे काम करीत असल्याने ते न समजण्यापलिकडचे आहे. अशावेळी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी उपाययोजनेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.