वजनमाप केंद्रावर रेतीचा प्रचंड साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:53 IST2018-07-06T00:52:41+5:302018-07-06T00:53:24+5:30
सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात.

वजनमाप केंद्रावर रेतीचा प्रचंड साठा
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात. अतिरिक्त रेती ट्रकमधून कमी करण्यात येते. एका वजन काट्याबाहेर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.
तुमसर-गोंदिया मार्गावर घाटकुरोडा रेती घाटावरुन रेती उत्खनन सुरु आहे. दररोज शेकडो ट्रक नागपुर येथे जातात. नदीघाटावरुन जवळच्या वजनमाप करणाऱ्या काट्यावर रेतीचे वजनमाप करण्यात येते. देव्हाडी- माडगी शिवारात वजनकाट्यावर रेती ट्रकची वजनमाप केले जाते. अतिरिक्त ट्रकमधील रेती काट्यावर कमी करण्यात येते. त्यामुळे येथे रेतीसाठा जमा झाला आहे.
साठा झाल्यानंतर रेती महसूल प्रशासनाने पंचनामा करून रेती साठ्याचा लिलाव करण्याचा नियम आहे, परंतु येथे लिलाव नियमित केला जात नाही. तलाठी मंडळ अधिकाऱ्यांची गाव पातळीवर साखळी आहे.वजनमाप केंद्रावर रेतीसाठीबाबत माहिती तहसीलदारांना दिली जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.
तुमसर - गोंदिया राज्यमार्गावर ही वजनमाप केंद्र आहेत. रेतीसाठा येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. महसूल कर्मचाऱ्यांचे लक्ष रेती साठ्याकडे जात नाही. पावसाळा सुरु झाला या दिवसात रेतीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यातील अनेक ठिकाणी रेतीसाठा करून ठेवल्याची माहिती आहे. चारगाव, सुकळी, रेती घाटावरुन रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. परसवाडा मार्गाचे ही रेती ट्रक्टरने नेली जाते. सुकळी येथील नदीत मोठे खड्डे पडले आहेत. परसवाडा येथील ग्रामस्थांनी रेती ट्रक्टरला गावातून बंदी करण्याची तक्रार दिली आहे. मध्यरात्री पासून ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक सुरु आहे. या ट्रॅक्टरचालकांना कुणाचे पाठबळ आहे. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गौण खनिजाची तुमसर तालुक्यातून लुट येथे थांबविण्याची मागणी होत आहे. रेतीचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून येथे फोफावला आहे, हे विशेष. तुमसरात उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे, नियमावर बोट ठेऊन येथे काम केली जात असल्याचे सांगण्यात येते. अवैध रेती वाहतुक व रेती उत्खननाकडे येथे लक्ष दिले जात नाही.
वजनमाप केंद्रावरील रेती साठ्याचा पंचनामा करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना तशी परवानगी मागितली आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून रेती साठयाचा अहवाल मागवून तात्काळ कार्यवाही केली जाईल.
- गजेंद्र बालपांडे
तहसीलदार तुमसर